Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक, जाणून घ्या ताजी आकडेवारी

कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार, संसर्गाच्या प्रकाराचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यात पुन्हा कोरोना संसर्गजन्य आजार हातपाय पसरत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दोन ते तीन अंकी कोरोनाबाधित रूग्णांची वाढ होत आहे. वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देखील गोव्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, शनिवारी राज्यात नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधित रूग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सायंकाळी राज्यातील कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, राज्यात शनिवारी 399 नमुने तापासण्यात आले, त्यापैकी 63 सकारात्मक आले आहेत. तर, दिवसभरात 117 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्याने कोणताही कोरोना रूग्ण दगावलेला नाही.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 98.16 टक्के एवढा आहे. सध्याच्या घडीला राज्यात 787 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गोव्यात आजवर 02 लाख 60 हजार 837 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 02 लाख 56 हजार 036 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजवर 4 हजार 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आढावा बैठकीत काय म्हणाले आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे?

राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व सरकारी इस्पितळांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यासह आवश्‍यकता भासल्यास ‘आरटीपीसीआर’ चाचणीही करण्यात येत आहे.

तसेच गोमेकॉतील वैद्यकीय पथकाला जिनोम सिक्वेन्सिंग मशीनरी कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार, संसर्गाच्या प्रकाराचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT