goa farmer protest Dainik Gomantak
गोवा

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

goa farmer protest: 'कृषी विभूषण' पुरस्काराने सन्मानित असलेले उदय प्रभूदेसाई यांनी कृषी खात्याच्या गलथान कारभाराविरोधात उपोषण सुरू केले

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ माजवणारी एक घटना समोर आली आहे. पेडणे तालुक्याचे प्रगतिशील शेतकरी आणि 'कृषी विभूषण' पुरस्काराने सन्मानित असलेले उदय प्रभूदेसाई यांनी कृषी खात्याच्या गलथान कारभाराविरोधात उपोषण सुरू केले आहे. कृषी खात्याच्या टोंक करंझाळे येथील मुख्य कार्यालयाच्या व्हरांड्यात बसून त्यांनी हे शांततापूर्ण आंदोलन छेडले आहे.

गैरव्यवस्थापनाने शेतकरी त्रस्त

उदय प्रभूदेसाई हे केवळ प्रगतिशील शेतकरी नसून, ते पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणे तालुक्यात भात कापणी मशीन संदर्भात कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या गैरव्यवस्थापनामुळे शेतकरी पूर्णपणे त्रस्त झाले आहेत.

कापणीच्या ऐन हंगामात मशीनची उपलब्धता आणि नियोजनातील गोंधळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी खात्याच्या या ढिसाळ कारभाराकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकरी समाजाला तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी त्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.

'मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही!'

प्रभूदेसाई यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मागण्या मान्य झाल्याशिवाय आणि कृषी खात्याकडून योग्य उपाययोजनांचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय ते आपल्या आंदोलनातून माघार घेणार नाहीत.

कृषी विभागातील गैरव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या वाढल्या असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे, अशी त्यांची मागणी आहे. कृषी खात्याचे मुख्यालय असलेल्या टोंक, करंझाळे येथील कार्यालयाच्या दारातच उपोषण सुरू झाल्याने, या आंदोलनाने प्रशासनाचे आणि जनतेचे तातडीने लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharbandora: सफर गोव्याची! थंडीत रंगणारा धालोत्सव, मांडावर येणाऱ्या ‘रंभा; धारबांदोड्याच्या आठवणी

VIDEO: हवेत उडाली स्टंप! हर्षित राणाच्या चेंडूनं कॉन्वेची दाणादाण, जल्लोष करताना गिलकडे पाहून केला 'हा' इशारा; व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran Protest: इराणमध्ये संघर्षाचा भडका!! भारतीयांना तातडीने देश सोडण्याचे आदेश; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली 'हाय-अलर्ट' अ‍ॅडव्हायझरी

Goa Assembly Elections 2027: गोव्यात भाजपचं 'मिशन 30'! फातोर्ड्यात सरदेसाईंना घेरण्याची तयारी; मायकल लोबोंचं सूचक विधान

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल'ला न्यायालयाचा मोठा दणका! पंचायत सचिवांनी दिलेला बांधकाम परवाना रद्द

SCROLL FOR NEXT