कोकणी भाषा मंडळाचे पदाधिकारी
कोकणी भाषा मंडळाचे पदाधिकारी Dainik Gomantak
गोवा

Goa:कोकणी भाषा मंडळाचे 2021चे पुरस्कार जाहीर...

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: कोकणी भाषा (Konkani language)मंडळाने आज 2021 वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मंडळाच्या 59व्या वर्धापनदिनी ऑनलाईन (Online)पद्धतीने आयोजित कार्यक्रमात हे प्रदान केले जातील.

या पुरस्कारांचे मानकरी ः

1) सेवा पुरस्कार - सुरेश पै 2) सॅराफीन कोता पुरस्कृत फेलिसियु कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार अनंत अग्नी 3)  जुजे पियेदाद क्वाद्रुस स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार - शिरीष पै 4) लिगारियो फुर्ताद ट्रस्ट पुरस्कारीता पुरस्कार - फा. किरीयल डिसौझा 5) दिनेश मणेरकर पुरस्कृत चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार - महेश दिवेकर 6) दिनेश मणेरकर पुरस्कृत रामनाथ मणेरकर भाषांतर पुरस्कार - पांडुरंग नाडकर्णी (पुस्तक) पाखांट्याबगर भुर्रर्र), 7) स्व. नरसिंह दामोदर नायक स्मरणार्थ साहित्य पुरस्कार - फा. मायरन जेसन बार्रेटो (पुस्तक - आपारीन्तल्यान संदेश - निबंध),  8) स्व. रॉक बार्रेटो स्मरणार्थ साहित्य पुरस्कार - स्व. श्रीधर कामत (पुस्तक - बेसूर - नाटक), 9) रमेश वेळुस्कर स्मरणार्थ साहित्य पुरस्कार - वामन टाकेकर (दया धन - कादंबरी). 

पुरस्कारांची (Awards)निवड करण्यासाठी परिक्षक मंडळाची नियुक्ती मंडळाने केली होती.यामध्ये

1) साहित्य पुरस्कार - प्रो. डॉ. प्रकाश वजरीकर, वसंत भगवंत सावंत, मार्कूस गोन्साल्विस

2)बाल साहित्य पुरस्कार - प्रशांती तळपणकर, रामनाथ गावडे व नयना अडारकर

3) सेवा पुरस्कार - डॉ. हरिश्र्चंद्र नागवेकर, संदेश प्रभुदेसाई, झिलू गावकर

4) कार्यकर्ता पुरस्कार - डॉ. प्रकाश पर्येकर, सॅराफीन कोता व अनंत अग्नी

5) शिक्षक पुरस्कार - अरुणा पाटणेकर, सुदेश नायक व डॉ. सोनिया शिरसाट

6) पत्रकारिता, स्तंभलेखन पुरस्कार - फावस्तो दा कोस्ता, प्रकाश कामत व अनिल पै

पुरस्कार प्रदान सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक देविदास कदम प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहतील. कोकणी कार्यकर्ते अँथनी वाझ यांची विशेष उपस्थिती असेल.पुरस्कार प्रदान सोहळ्या व्यतिरिक्त ऑनलाईन पद्धतीनेच गायन व नृत्य सादरीकरण होणार आहे. अशी माहिती सिंगबाळ यांनी दिली.

सदर कार्यक्रम https://www.youtube.com/c/KonkaniBhashaMandalGoa या यु ट्युब चॅनलवरुन व https://www.facebook.com/KonkaniBhashaMandal या फेसबूक पेज वर थेट प्रक्षेपिक केला जाणार आहे. सद्यस्थितीतील कोरोना-19 विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आल्यावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मंडळाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे, याची सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी नोंद घ्यावी, असे सिंगबाळ यानी स्पष्ट केले आहे.

यंदा मनोहर राय सरदेसाई (Manohar Rai Sardesai)स्मरणार्थ बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला नाही असे मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ (Anvesha Singhbal)यांनी सांगितले. वरील सर्व पुरस्कार आज त्यांनी जाहीर केले. या प्रसंगी उपाध्यक्ष पॉब्र फर्नांडिस (Pobr Fernandes)व सचिव उल्हास गावकर (Ulhas Gavkar)उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT