Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांतही वाहनांना शुल्क भरावे लागणार; मडगाव स्थानकातील दर जाहिर

Konkan Railway: कोकण रेल्वेचे उप प्रादेशिक व्यवस्थापक बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही ठेकेदाराला हे काम तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कोकण रेल्वेने शुल्क घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वाहन 10 मिनिटे थांबल्यास शुल्क आकारले जाईल. स्थानकावर पार्किंग रेटचा बोर्डवर लावला असून त्यावर कुठल्या वाहनासाठी किती शुल्क आकारणी केली जाईल याची माहिती देण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून हा बोर्ड रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावला असून उमिया एंटरप्राइजेसने हे कॉन्ट्रॅक्ट घेतले असल्याचे समजतेय. मात्र प्रवाश्यांना देण्यात येणाऱ्या पावतीमध्ये मात्र SNN एंटरप्राइज असे नाव असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

कोकण रेल्वेचे उप प्रादेशिक व्यवस्थापक बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही ठेकेदाराला हे काम तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून अद्याप ही सुविधा सुरू केलेली नाही. ठेकेदाराला सांगूनही कालपासूनच ठेकेदाराकडून प्रवेशद्वारावर बोर्ड लावून वाहनांकडून पैसे आकारले जात आहेत.

या बोर्डवर शुल्क आकारण्यात येणाऱ्या वाहनाचे प्रकार देण्यात आले असून यामध्ये पर्यटक बस, पर्यटक मिनीबस, चारचाकी वाहन, तीनचाकी वाहन, दुचाकी आणि सायकलला सुद्धा शुल्क आकारण्यात येणार आहे. 2 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंतचे दर दाखवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT