घटनास्थळी चौकशी करताना पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले, वेर्णा पोलीस निरीक्षक प्रशल देसाई आणि इतर पोलीस. Dainik Gomantak
गोवा

Goa: झुआरीनगर- सांकवाळ येथे अज्ञातांकडून हत्या

संशयास्पद मृतदेह आढळला आणि स्थानिकांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यानंतर पोलिसांना खबर दिली.

दैनिक गोमन्तक

वास्को: विद्यानगर कॉलनी, झुआरीनगर- सांकवाळ येथे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळील अंतर्गत रस्त्यावर शनिवारी रात्री अन्वर शेख (56) या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आणि पोलिसांना (Police) खबर दिली. वेर्णा पोलिसांना खुनाचा संशय असून वेर्णा पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हा नोंदवून त्याच्या हत्येमागे असलेल्यांचा शोध सुरू केला आहे. सांकवाळ, झुआरीनगर येथे राहणाऱ्या अन्वर शेख (वय 56 ) हे मध्यरात्री जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात अंतर्गत रस्त्यावर पडलेला एका व्यक्तीला दृष्टीपथास पडला. त्यांने त्वरित याविषयी वेर्णा पोलिसांना कळविले असता वेर्णा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक (Local people) रहिवाशांच्या मदतीने त्याला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. झुआरीनगरातील अन्वर यांच्या कपाळावर अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचे आणि कपाळाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस तिक्ष्ण जखमा झाल्याचे पोलिसांना तपासणी वेळी आढळले. वेणां पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हा नोंदवून त्याच्या हत्येमागे असलेल्यांचा शोध सुरू केला आहे. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर शेख हे पूर्वी एमपीटीमध्ये (मुरगाव बंदरा मेकॅनिकल विभागात कामाला होते. 2012 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. अन्वर हे इस्लाम्पुर, बायणा येथील रहिवासी होते. चांगले गायक अशीही त्यांची ओखळ आहे. सध्या हुआरीनगरात ते राहत होते. ज्या ठिकाणी ते जखमी अवस्थेत सापडले. त्याच्या जवळपास एका फ्लॅटमध्ये ते भाड्याने रहायचे.वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT