Crime Case Dainik Gomantak
गोवा

Khorlim: 'आई वडिलांना जबाबदार धरू नका!' सुसाईड नोट लिहून खोर्लीत कॉलेज तरुणाने संपवलं आयुष्य

गोमन्तक डिजिटल टीम

स्नेहा हसोटीकर

Crime Case गोव्यात रस्ते अपघातांसोबतच आत्महत्येचं प्रमाण वाढत असून यात तरुण वर्गाची टक्केवारी जास्त असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येतेय. याविषयाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर येतेय.

आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी म्हापसा खोर्ली येथे एका 18 वर्षाच्या मुलाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

या संबंधी मिळालेली प्राथमिक माहिती पुढील प्रमाणे, स्वयम वैकुंठ नाईक (रा. खोर्ली, परेरवाडा वॊर्ड नं 18) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो म्हापसा येथील झेवियर कॉलेजमध्ये फर्स्ट इयर साईन्सला शिकत होता. तसेच त्याने नुकतीच JEE exam देखील दिली होती.

आज तो कॉलेजमधून येऊन आपल्या घरातील फर्स्ट फ्लोअरवरील रूममध्ये गेला. बराच वेळ झाल्यावर तो खाली येईना म्हणून त्याचे वडील दुपारी 3 च्या दरम्याने त्याला बोलावण्यासाठी रूमपाशी गेले असता त्यांना रूम आतून बंद असल्याचे दिसले.

त्यांनी खिडकीतून आत डोकावल्यावर त्यांना स्वयम हा डोक्याला पूर्णपणे प्लास्टिक बॅग गुरफटून कॉटच्या खाली पडलेला आढळला. वडिलांनी त्याला बाहेर काढून लगेच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेय.

या घटनेच्या पंचनाम्यावेळी पोलिसांना त्याच्या मोबाईलवर सुसाईड नोटआढळून आलीय. तसेच त्याने खोलीतील टेबलवरही एका कागदावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

त्यात त्याने असे लिहिले होते कि, ''या घटनेला माझ्या आई वडिलांना जबाबदार धरू नका. माझा कोणावरही कसलाही आरोप नाही''. पोलिसांनी ती नोट आणि फोन ताब्यात घेतला असून पुढील तपास म्हापसा पोलीस करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT