Goa | Kerim Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी-तेरेखोल फेरीधक्का नागरिकांसाठी ठरतोय धोकादायक!

Goa: तेरेखोल धक्यावर मोठ्या प्रमाणात रेती, वाळू साचल्याने फेरीबोटीत वाहने टाकतांना अडचणी येतात.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवामुक्त होऊन 60 वर्षापेक्षाही जास्त वर्षांचा काळ लोटला, मात्र आजही पेडणे तालुक्यातील तेरेखोल गावाला महाराष्ट्रातून वीज, पाणीपुरवठा होतो. त्यांच्या सोयीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. केरी-तेरेखोल फेरीधक्का आहे. त्या धक्यावर मोठ्या प्रमाणात रेती, वाळू साचून फेरीबोटीत वाहने घालताना अडचणी येतात.

शिवाय फेरीबोटही भरती-ओहाटीवर अवलंबून असते. सरकारने या नदीवर पूल बांधण्यासाठी कायदेशीर सर्व सोपस्कार न केल्याने अर्धवट स्थितीत हा पूल आहे, त्यावर खर्च केलेला वाया जात आहे.

केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील तेरेखोल नदी पलीकडे केवळ ख्रिस्ती बांधवांची लोकवस्ती असलेला केरी गावाचा हा एक प्रभाग आहे. या प्रभागात 365 ग्रामस्थ राहतात. इतिहासाची साक्ष देणाऱ्या तेरेखोल गावात सावंत भोसले यांच्या काळातील तेरेखोल किल्ला आहे. शिवाय हिरवे गुरुजींचे स्मारक या ठिकाणी आहे. हा तेरेखोल-केरी गावाचा भाग केरी आणि तेरेखोल या दोन गावामधून तेरेखोल नदी वाहते. त्यामुळे केरी व तेरेखोल दोन्ही भाग वेगवेगळे झाले आहेत.

मार्चपर्यंत वीज मिळणार!

तेरेखोलला सध्या महाराष्ट्रातून वीजपुरवठा केला जातो. पण लवकरच गोव्यातून वीजपुरवठा होणार आहे. तत्कालीन आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रयत्नातून वीज खात्याअंतर्गत वीज केबल घालून त्या ठिकाणी वीजपुरवठा करण्यासंदर्भात योजना आखली होती. त्यानुसार बरेच काम झाले आहे. याबाबत आमदार जित आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता, ते म्हणाले, मार्चपर्यंत केबलचे काम पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT