Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

केंद्राचे कर्नाटकवर प्रेम नाही का? म्हादईच्या पाण्यावरुन CM सिद्धरामय्या आणि MP तेजस्वी सूर्या यांच्यात जुंपली

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ट्विटला भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे प्रत्युत्तर

Ganeshprasad Gogate

Mahadayi Water Dispute : म्हादई नदीच्या पाण्यावरून गोवा- कर्नाटक राज्यात वाद सुरु आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्राच्या निष्क्रियतेमुळे म्हादई प्रकल्प रखडल्याचे ट्विट केले आहे. केंद्राचे कर्नाटकवर प्रेम नाही का?

हुबळी धारवाड आणि परिसरातील 50 लाख रहिवाशांसाठी म्हादई प्रकल्प आवश्यक असून पंतप्रधान आमची तहान कधी भागवणार? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता.

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटक राज्याच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यात काँग्रेसच अपयशी ठरल्याचे ट्विट त्यांनी केलेय. तुम्ही तुमच्या कार्यकाळात कर्नाटक राज्यासाठी काय केले हे सांगा असा सवाल तेजस्वी सूर्या यांनी उपस्थित केला आहे.

म्हादई नदीच्या पाण्याचा एक थेंबही पाणी कर्नाटकला देऊ देणार नाही, असे काँग्रेस पक्षाने 2007 आणि 2022 मध्ये गोव्यातील जनतेला जाहीर आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हादई प्रश्नी आश्वासक भूमिका घेत नदीचे पाणी कर्नाटकातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले.

तसेच केंद्रातील मोदी सरकारने देखील सन 2022 मध्ये कळसा भांडुरा नाला प्रकल्पाच्या डीपीआरला मान्यता देत राज्याचा पाणी प्रश्न सोडवला. मात्र कर्नाटकाची सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यात तुम्ही सपशेल अपयशी ठरला आहेत. तुमच्या कार्यकाळात कर्नाटक राज्यासाठी तुम्ही काय केले हे सांगा? असा सवाल तेजस्वी सूर्या यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT