गोवा-कर्नाटक रेल्वे मार्गावर दरड Dainik Gomantak
गोवा

गोवा-कर्नाटक रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेचे इंजिन घसरले

गोवा-कर्नाटक रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने कोंकण रेल्वे मार्गावरील 5 तर दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील 1 अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्याजवळ कर्नाटक हद्दीत सोनावळी येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्याने आज सकाळी मुंबईला जाणाऱ्या मंगळुरू- मुंबई स्पेशल ट्रेनचे इंजिन आणि एक डबा रुळावरून घसरल्याने आधीच पावसामुळे विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी ठप्प झाले. या घटनेनंतर कोंकण रेल्वे मार्गावरील 5 तर दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील 1 अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या. आज सकाळी 6.20 च्या दरम्यान ही घटना घडली असे रेल्वेच्या सूत्रांकडून माहिती मिळाली. घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ही दरड कोसळून माती रुळावर आल्याने हा अपघात घडला. (Goa-Karnataka border landslide: train loses track; Konkan railway suspended)

या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. ही गाडी नंतर कुळे रेल्वे स्थानकावर आणून ठेवली व गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बसमधून मडगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. रत्नागिरीत वाशिष्ठी नदीला पूर येऊन रेलमार्ग पाण्याखाली गेल्याने कोंकण रेल्वे मार्गावरील गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एका गाडीला हा अपघात घडला.

हा पर्यायी मार्गही या अपघातामुळे बंद झाल्याने कोंकण रेल्वे मार्गरवरील मडगाव- मुंबई जनशताब्दी, एर्नाकुलम - निझमुद्दीन स्पेशल, निझमुद्दीन - एर्नाकुलम स्पेशल, मडगाव - एलटीटी स्पेशल व मंगळुरू - सीएसटी स्पेशल या पाच तर दक्षिण मध्य मार्गावरील वास्को- हावडा अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या तर कोचुवेली - इंदूर साप्ताहिक रेल्वे राणींगुंटा- विजयवाडा- भोपाळ या मार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT