Kala Academy Slab Collapsed  Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude बहुजन समाजातील असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय- जयेश नाईक

सरपंच जयेश – माशेलात विरोधकांच्या वक्तव्याचा निषेध

Ganeshprasad Gogate

Kala Academy Slab Collapsed गोविंद गावडे हे कार्यतत्पर व कार्यक्षम मंत्री असून त्यांनी विकासाचा मार्ग अवलंबलेला आहे. सर्वांचा विकास हे एकच ध्येय घेऊन ते कार्यरत आहेत. अशा मंत्र्यांचा थेट काहीही संबंध नसताना खुल्या रंगमंचाचा छत कोसळण्याशी संबंध जोडला जातो, त्याला गावडेंना जबाबदार धरले जाते, हे चुकीचा आहे.

विरोधकांचे आरोप निराधार आहेत, असे मत तिवरे – वरगावचे सरपंच जयेश नाईक यांनी माशेल घेतलेल्या पत्रकारपरिषेदत व्यक्त केले.यावेळी पंच फ्रान्सिस लोबो, अपर्णा आमोणकर, सिद्धा गाड, शिल्पा वेरेकर, संजू कुंडईकर, एकनाथ परब, उपसरपंच सुमित्र नाईक उपस्थित होते.

जयेश पुढे म्हणाले, छताचे काम 40 वर्षापूर्वीचे असून त्याला आत्ताच्या कामासाठी काहीही संबंध नाही. शिवाय कला अकादमीचे काम करणारे खाते वेगळे आहे, त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी त्यांचीच असताना गोविंद गावडेंचा राजिनामा मागणे चुकीचे आहे.

पणजी शहराच्या दुरवस्थेबद्दल, काही रस्ते, दरडी कोसळत आहेत. पुलाचे कठडे कोसळत आहेत, यामुळे जनतेला नाहकत्रास सहन करावा लागत आहे. परंतु याबद्दल विरोधक काहीच बोलत नाहीत, कुठेही त्यांचा राजिनामा मागत नाहीत.

पण बहुजन समाजातील एक नेता अल्पावधित आपल्या मतदारसंघात आणि राज्यात सुद्धा झपाट्याने विकास कामे करतो, कला संस्कृती खात्यातर्फे कलाकारांसाठी भरीव कार्य करतो, म्हणून मुद्दाम टार्गेट केले जाते. त्यांनी स्वतः सत्तेत असताना काय केले, याचा विचार करावा.

डोळस विचार करा

तळागाळातील जनतेच्या सुखसोयीसाठी झटणाऱ्या मंत्री गावडे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. ते स्वतः अभियांत्रिकेचे जाणकार आहेत. ते प्रत्येक काम नेमकेपणाने व दर्जेदार व्हावे, यासाठी कार्यरत असतात, अगदी छोटे कामसुद्धा ते उत्तम व्हावे, यासाठी झटत असतात, तेव्हा अशा मंत्र्यावर आरोप करताना विरोधकांनी डोळस विचार करावा, असे सरपंच जयेश म्हणाले.

अहवालानंतर बोला!

रंगमंचाचे छत्र का कोसळले, नेमके कारण काय, याबाबत अहवाल येणे बाकी आहे. तो अहवाल आल्यावर संबंधित जबाबदार असतील. त्यात काय त्रुटी होत्या, यावरून विरोधकांनी आपले मत द्यावे, आत्ता अहवाल नसतात, बिनबुडाचे आरोप का करता? असेही जयेश म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT