Drama  Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: गोव्याच्या उत्सवी रंगभूमीला बऱ्याच वरच्या पायरीवर नेणारे 'हॅण्ड्सअप' हे विलक्षण नाटक

तज्ज्ञांकरवी मूल्यमापन गरजेचे : संस्थेची वाटचाल ‘व्यावसायिक’ रंगभूमीकडे करण्यास योग्य प्रयोग

दैनिक गोमन्तक

Kala Academy: सातेरी कला मंदिर, हसापूर-पेडणे या संस्थेने वसंत कामत लिखित ‘हॅण्ड्सअप’ हे नाटक स्पर्धेत सादर केले. रविराज प्रभू या रेसकोर्सचे आकर्षण असलेल्या व्यक्तीची नवीनच लग्न झालेली बायको मारिया अचानक नाहीशी होते. रविराज अत्यंत अस्वस्थ असल्याचे दिसते.

पोलीस चौकशी चालू असताना अचानक एक भलतीच स्त्री मारिया प्रभू बनून रविराजच्या रूमवर फादर डिसोझांसमवेत येते. रविराज तिला बायको म्हणून नाकारतो. तरीही ती अनेक पुरावे देऊन आपण बायको असल्याचे सिद्ध करत जाते. रविराजही नवनवीन पुरावे इन्स्पेक्टरना दाखवून ती बोगस बायको आणि फादर डिसोझा संगमनत करून आपला पाच

लाखांचा विमा आणि आपल्या बायकोसाठी तिच्या मावशीने ठेवलेली पाच कोटींहून अधिक असलेली मालमत्ता गीळंकृत करण्यासाठी आपल्याला मारण्याच्या हेतूने आल्याचे इन्स्पेक्टरला सांगतो. जोपर्यंत खरी बायको सापडत नाही, तोपर्यंत या घटनांचे रहस्य वाढत जाते.

चौकशीदरम्यान मामा पाठक यांच्या पोटात सुरा खुपसण्याचा आणि फादर डिसोझांवर गोळी झाडल्याचा आरोप रविराजवर होतो. रविराजला इन्स्पेक्टर यादवही कटात सामील असल्याचे कळून चुकते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपली तक्रार करताना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतेवेळी अचानक आपल्या बायकोच्या मृतदेहाचा ठावठिकाणा रविराज सांगून जातो.

इन्स्पेक्टर यादवनी रविराजच्या बायकोच्या खुनाचे रहस्य उलगण्यासाठी आपल्या बायकोसकट इतर पात्रांची नेमणूक केल्याचे रविराजला कळून चुकते.

दिग्दर्शक गोविंद (गोट्या) नाईक यांनी नाटक गतिमान करण्याचे भरपूर प्रयास केले. नाटक सादर करण्याचा कालावधी आणखी तीन मिनिटे वाढला असता तर नाटक स्पर्धेच्या बाहेर पडले असते.

एका छोट्याशा नाट्यबिजातून तीन तासांपर्यंत नाटक खेळवायचे तंत्र आजच्या टीव्ही सिरीयल किंवा सिनेमासारखे वाटले. संवादफेकीतील अडखळेपणा व ‘वाटेल तसा पैसा मोडायला मी कबूल आहे’ सारखी अशुद्ध वाक्ये सोडली तर प्रयोग व्यवस्थित सादर झाला.

भू ही मध्यवर्ती भूमिका शेवटपर्यंत बेअरिंग

सांभाळत केली. इन्स्पेक्टर यादवच्या भूमिकेत नीलेश नाईक शोभून दिसले. त्यांची संवादफेक ठिक होती. मारिया प्रभूच्या व्यक्तिरेखेत अंकिता गवस शोभून दिसल्या. त्यांनी आपल्या नजरफेकीतून आणि शारीरिक अभिनयातून भूमिकेस योग्य न्याय दिला. फादर डिसोझाची भूमिका करताना सुहास मळीक यांनी विशेष कष्ट घेतलेले दिसले.

त्यांचा धीरगंभीर आवाज भूमिकेस योग्य दिसला. मामा पाठक हे पात्र अरविंद नाईक यांनी धमालपणे रंगविले. एकनाथ पारकरच्या भूमिकेत प्रजय मळीक आणि मिसेस पारकरच्या व्यक्तिरेखेत मैथिली मराठे उठून दिसल्या.

जवाहर बर्वे यांनी पार्श्वसंगीताची मांडणी प्रयोगाच्या मागणीनुसार केली. अरविंद नाईक यांच्या नेपथ्यात बुद्धिबळाच्या खेळाची आणि जाळ्याच्या ‘ट्रॅप’ची कल्पना होती. हर्ष मळीक यांची प्रकाशयोजना आकर्षक असली तरी सदोष होती.

राजेंद्र हरमलकर यांनी रंगभूषा तर सुहाना मळीक यांनी वेशभूषा ठिकपणे केली. साहाय्यक संकल्प नाईक, हर्ष मळीक, नितेश नाईक, चैतन्य गवस आणि संजय नाईक तसेच सूत्रधार म्हणून सुहास मळीक यांनी काम पाहिले.

सातेरी कला मंदिर हसापूर-पेडणे यांचा सादर झालेला प्रयोग गोव्याच्या उत्सवी रंगभूमीला बऱ्याच वरच्या पायरीवर नेणारा आहे, तसेच संस्थेची वाटचाल ‘व्यावसायिक’ रंगभूमीकडे करण्यास योग्य आहे. पण कला अकादमीच्या ‘अ’ गट स्पर्धेत झालेल्या या प्रयोगाचे तसेच स्पर्धेतील अन्य अशाच सादरीकरणांचे तज्ज्ञांकरवी मूल्यमापन करणे योग्य ठरेल. यादृष्टीने कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेचे सुरुवातीपासून थोडे स्मरण करणे योग्य ठरेल.

या संस्थांच्या आग्रहामुळे गोव्यातील तरुण-तरुणी नाट्य शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ लागल्या. इतकेच नव्हे तर या स्पर्धेच्या नाट्यवेडापायी गोव्यात कला अकादमीला नाट्य विद्यालय स्थापन करणे भाग पडले. अकादमीने काम करणाऱ्या रंगकर्मींसाठी संध्याकाळच्या वेळी नाट्य शिक्षणाची सोय करून दिली.

कला अकादमीच्या नाट्यविद्यालयातील सुरुवातीच्या तुकड्यामधील आणि बाहेरगावी नाट्यशिक्षण घेतलेल्या लोकांनी कला अकादमी नाट्य स्पर्धा समृद्ध केली. अनेक वेळा महाराष्ट्र अंतिम फेरीत बक्षिसे मिळविली. व्यावसायिक रंगभूमीला, चित्रपटाला नवीन कलाकार मिळवून दिले.

ज्या कला अकादमी अ गट स्पर्धेमुळे प्रायोगिक रंगभूमीच्या संबंधात वेगळेपणा आणि नवेपणाची भर पडली तिथे कलात्मकता हरवत चालल्यासारखे वाटते. सादरीकरणाच्या नवनवीन वाटा चोखाळताना दिसत नाहीत.

काही वर्षांपूर्वी सादर केलेल्या नाट्यकृती नव्याने सादर करण्यात, व्यावसायिक रंगभूमीसाठी असलेली नाटके कॉपी करण्यात, सिनेमातून ‘फ्रेम बाय फ्रेम’ उचलून नाटक करण्यात किंवा काही वर्षांपूर्वी स्पर्धेत गाजलेली नाटके तशीच सादर करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसून येते.

गोव्यात प्रायोगिक रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्न केलेल्या वरील संस्थांचे आणि त्यातील रंगकर्मींचे, कलाकारांच्या कामांचे, दस्तऐवजीकरणाचे काम कला अकादमी, सरकार किंवा इतरांतर्फे झाले नाही.

ज्येष्ठांच्या तोंडून ऐकायला भेटेल ते ऐकण्याची तयारी नवीन कलाकार ठेवताना दिसत नाहीत. गेल्या कित्येक वर्षांत स्वर्गवासी झालेल्या कलाकारांचे संचित साठवलेले नसल्यामुळे प्रयोग सादरीकरणाच्या आणि निर्मितीच्या विविध प्रक्रिया काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत.

नाट्य शिक्षणात नाटकाचे सौंदर्यशास्त्र, ‘ड्रॅमेटिक अस्थेटिक्स’ या विषयांचा योग्यपणे अंतर्भाव झाला तर जीवनमूल्यांचा अतिशय सूक्ष्मतेने विचार करून हिमतीने जगणारा कलाकारच गोव्याच्या येणाऱ्या काळातील प्रायोगिक स्पर्धात्मक रंगभूमीला योग्य दिशा देऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT