Kadamba Electric Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Electric Bus: ई-बसेसना 29 तासांचा 'ब्रेक', कदंबची चार्जिंग व्यवस्था ठप्प; अनेक मार्गांवरील बससेवा बंद

Panaji Depot Bus Charging Failure: कदंब वाहतूक महामंडळाच्या पणजी आगारातील विद्युत बसेसची बॅटरी चार्जिंग व्यवस्था तब्बल २९ तास बंद राहिल्‍याने अनेक मार्गांवरील बससेवा बंद ठेवण्याची वेळ महामंडळावर आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाच्या पणजी आगारातील विद्युत बसेसची बॅटरी चार्जिंग व्यवस्था तब्बल २९ तास बंद राहिल्‍याने अनेक मार्गांवरील बससेवा बंद ठेवण्याची वेळ महामंडळावर आली. परिणामी शेकडो प्रवाशांचे हाल झाले. या प्रकारा जबाबदार कोण, यावरून आता वीज खाते आणि कदंब प्रशासन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

कदंब महामंडळाकडे सध्या मोठ्या प्रमाणावर विद्युत बसेस कार्यरत आहेत. पणजी, मडगाव आणि पर्वरी येथे या बसेसच्या बॅटऱ्या चार्ज करण्याची व्यवस्था आहे. शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसच्या बॅटऱ्या प्रामुख्याने पर्वरी येथे चार्ज केल्या जातात, तर लांब पल्ल्याच्या बसेसची चार्जिंग व्यवस्था पणजी आगारात आहे. मात्र पणजी आगारातील वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम झाला.

वीज खात्याचे साहाय्‍यक अभियंता चेतन नास्नोडकर यांनी ‘गोमन्‍तक’ला दिलेल्या माहितीनुसार, ईडीसी उपकेंद्रातून कदंब आगाराला ३३ केव्ही फिडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. या ठिकाणी एक मुख्य (मेन) आणि एक तपासणी (चेक) मीटर क्युबिकल आहे. मुख्य क्युबिकल वीज खात्याच्या तर चेक क्युबिकलची जबाबदारी कदंब प्रशासनाकडे आहे. परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्राहक म्हणून कदंबची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्युबिकल परिसरातील झाडाचा पालापाचोळा साचल्यामुळे मुख्य मीटर क्युबिकलमध्ये ‘फ्लॅश ओव्हर’ झाला आणि काल बुधवारी दुपारी दीडच्‍या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. याचा परिणाम केवळ कदंब आगारावरच नव्हे, तर रायबंदरपर्यंतच्या निम्म्या शहरावर झाला. तपासणीदरम्यान दोष आढळल्यानंतर दुरुस्तीचे काम पर्वरी येथील शिवम कंबाईन्स या कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले, असे नास्नोडकर यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी वापरण्यात आलेला इन्सुलेट कोट रात्रभर सुकणे आवश्यक असल्याने आज गुरुवारी सकाळी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सकाळी साडेदहाच्‍या सुमारास पुन्हा एकदा फ्लॅशओव्हर झाल्याने वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर कंत्राटदाराकडून पुन्हा दुरुस्ती करण्यात आली आणि अखेर सायंकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, कदंबच्या पणजी आगाराचे व्यवस्थापक गिरीश गावडे यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, बुधवारी रात्रीच काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते आणि आज सकाळी वीजपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा होती.

मात्र पायोनियर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे दोष शोधण्यात विलंब झाला. त्यामुळे अनेक नियोजित बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. या बिघाडाचा सर्वाधिक फटका वास्को शटल सेवेला बसला. ही सेवा दिवसभर पूर्णपणे बंद राहिली.

शिवाय आखाडा, साळ, भूतवाडी, चोडण, आमडी आदी भागांकडे जाणाऱ्या बससेवाही काही काळासाठी ठप्प राहिल्या. प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कदंब प्रशासनाने काही बसेस साखळी येथील केंद्रात चार्ज करून आणल्या. त्यामुळे सायंकाळनंतर काही मार्गांवरील सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. तसेच काही मार्गांवर डिझेल बस चालवून सेवा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

डिझेल बसद्वारे सांभाळली सेवा : विद्युत बस चार्ज न झाल्याने पुढील मार्गांवर डिझेल बसेस सोडण्यात आल्या. पणजी – शिरशिरे, पणजी – कळंगुट, पणजी – मोपा, पणजी – तुळस्करवाडी, पणजी – आखाडा, पणजी – आमठाणे, पणजी – कुडचडे, पणजी – लेखा खाते, पणजी – हरमल.

वादाचा केंद्रबिंदू काय?

वीज खात्याचा दावा :

क्युबिकल परिसराची स्वच्छता राखणे कदंबची जबाबदारी.

झाडाचा पालापाचोळा साचल्याने फ्लॅशओव्हर.

तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित.

कदंबची भूमिका :

दुरुस्ती पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते.

ट्रान्सफॉर्मरमधील दोषामुळे झाला विलंब.

वीजपुरवठा वेळेत सुरू न झाल्याने बससेवा विस्कळीत.

सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या बसेस

पणजी – वाळपई (धावे)

पणजी – दाबाळ – शिरोडा

पणजी – वळवई – माशेल

पणजी – डिचोली

पणजी – वाळपई – कोपार्डे

पणजी – टायटन – साखळी

पणजी – मायणा – सुर्ल

पणजी – विर्डी

पणजी – हरवळे

पणजी – आश्वे

पणजी – मोरजी

पणजी – वारखंड

पणजी – उसप

पणजी – मोर्ले

पणजी – अडवई

पणजी – माडेल

पणजी – आखाडा

पणजी – दुर्भाट

पणजी – मडकई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT