Goa Job Dainik Gomantak
गोवा

Jobs in Goa: 147 पदांसाठी 30 हजाराहून अधिक अर्ज आणि एका दिवसात 8 हजार कॉल; नक्की काय आहे दक्षिण गोव्यातील हा प्रकार, वाचा..

Jobs in Goa: नोकर भरती : सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना जुंपले कामाला

गोमन्तक डिजिटल टीम

Jobs in Goa: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीतर्फे कारकून, ज्युनियर स्टेनोग्राफर्स, मल्टी टास्कींग आदी पदांवरील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. १४७ पदांसाठी तब्बल ३० हजार ११४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

मात्र, बऱ्याच उमेदवारांचे पत्ते अपुरे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत होती. यावर तोडगा म्हणून भर शनिवारी आणि रविवारी सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामाला जुंपले आणि तब्बल आठ हजारहून अधिक उमेदवारांना फोनवरून सूचना करण्यात आल्या.

29 व 30 सप्टेंबर असे दोन दिवस दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कचेरीत ज्युनियर स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले होते, त्या सर्वांना टपालाने लेखी परीक्षा व मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते.

मात्र, पत्ते अपुरे असल्यामुळे अनेक उमेदवारांनी त्यासंदर्भात तक्रार केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कचेरीने सावधानता बाळगून शनिवार आणि रविवारी सुट्टी असूनही कर्मचाऱ्यांना कचेरीत बोलावले आणि अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांना फोनवरून सूचना दिल्या.

या पदांसाठी ३० हजार ११४ उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात अर्ज केलेल्यांची संख्या १८ ते २० हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

45 जण गुंतले कामात

1. या कामासाठी अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे ४५ जण कचेरीत उपस्थित होते. शनिवार एकाच दिवसात सुमारे ८ हजार उमेदवारांना फोन करून लेखी परीक्षा व मुलाखतीची माहिती देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कचेरीतून सांगण्यात आले. उर्वरित उमेदवारांना रविवारी फोन करण्यात आले.

2. प्रत्येक उमेदवाराचा लॅण्डलाईन फोन किंवा मोबाईल क्रमांक शोधून काढून त्यांना फोन करणे, हे जिकिरीचे काम होते. काही जणांनी फोनला प्रतिसाद दिला, तर काहीजणांनी प्रतिसादच दिला नाही, तर काहींचे फोन बंद असल्याचे दिसून आले, असे जिल्हाधिकारी कचेरीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

3. कचेरीत कामाची विभागणी करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक शोधण्याचे काम केले. काहींनी फोन केले. ज्यांनी प्रतिसाद दिला, त्यांच्या नावापुढे तिसऱ्याने

फुली मारली. काही कर्मचाऱ्यांना एसएमएस व ई-मेल पाठविण्यास सांगितले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT