Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: 'माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, पालेकरांकडे फक्त मदतीसाठी गेले', पूजा नाईकचे राजकीय संबंधांवर स्पष्टीकरण

Goa Cash For Job Scam: पूजाने तिच्या राजकीय संबंधांवर होत असलेल्या टीकेवरही उत्तर दिले. तिने स्पष्टपणे सांगितले, "मी कोणत्याही राजकीय पक्षात सामील नाही. माझा कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नाही.

Manish Jadhav

Goa Cash For Job Scam: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक नव-नवे खुलासे करत आहे. तिने नुकतेच या गंभीर प्रकरणी राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासोबत काही अधिकाऱ्यांची नावे घेऊन मोठा गौप्यस्फोट केला. या अधिकाऱ्यांपैकीच एक आयएएस निखील देसाई यांनी पूजाला मानहानीची नोटीस पाठवली. यानंतर आता, पूजाने आपल्यावरील विविध आरोप आणि कायदेशीर कारवाईवर स्पष्टीकरण दिले. आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे तिने ठामपणे सांगितले.

मानहानीच्या नोटीसवर उत्तर देण्यास तयार

दरम्यान, आयएएस देसाई यांनी आपल्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याचे पूजाने मान्य केले. ती म्हणाली, "माझ्या विरोधात आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. मात्र मला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यानंतर मी त्यास योग्य ते उत्तर देईन."

या प्रकरणाच्या चौकशीसाठी ती पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचेही तिने सांगितले. "मी माझे सर्व मोबाइल नंबर पोलिसांना दिले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मी विनंती करते," असे तिने स्पष्ट केले.

'अमित पालेकरांकडे फक्त मदतीसाठी संपर्क'

त्याचवेळी, पूजाने तिच्या राजकीय संबंधांवर होत असलेल्या टीकेवरही उत्तर दिले. तिने स्पष्टपणे सांगितले, "मी कोणत्याही राजकीय पक्षात सामील नाही. माझा कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नाही."

आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर (Amit Palekar) यांची भेट घेतल्याचा तिने खुलासा केला. पूजा म्हणाली, "माझे कुटुंब आणि मी अमित पालेकर यांच्याकडे केवळ मदतीसाठी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला मदत करण्याचे आश्वासनही दिले होते."

मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

या संपूर्ण प्रकरणात फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळावेत यासाठी पूजाने अखेरीस थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली. पूजा म्हणाली, "मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, मी नोकरी मिळवून देण्यासाठी ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, ते पैसे मला परत मिळवून द्यावेत, जेणेकरुन मी ते पीडितांना परत करु शकेन."

पूजा नाईकच्या या वक्तव्यामुळे नोकरी घोटाळा प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एका बाजूला मानहानीच्या कारवाईला तोंड देण्याची तयारी आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी, यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'अ' गट नाट्यस्‍पर्धेचा निकाल फिरवण्‍यासाठी परीक्षकांवर दबाव, कला अकादमीच्‍या कर्मचाऱ्यांचेच कृत्‍य; प्रत्‍येकी 50 हजार, मद्य पार्टीचे आमिष

19 February 2026 Horoscope: फुलेरा दूजचा शुभ मुहूर्त, आज 'या' राशींच्या नशिबात पद-प्रतिष्ठेचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Shivaji Maharaj: अफजलखानाचा कोथळा काढला, महाराजांनी गाठला पन्हाळा; कोल्हापूरावर फाजलखान चालून आला अन्...?

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

SCROLL FOR NEXT