Automated vacuum Sewer Dainik Gomantak
गोवा

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Panjim Goa: सांडपाण्याचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी पणजीतील काही भागांमध्ये नवीन व्हॅक्यूम सीवर नेटवर्क प्रणाली सुरू केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पणजीतील काही भागांमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन व्हॅक्यूम सीवर नेटवर्क प्रणाली सुरू केली आहे. अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) चा एक भाग असलेला हा आधुनिक प्रकल्प 200 हून अधिक घरांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल.

राज्यातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारं गोवा हे पाहिलं राज्य ठरलं आहे. अलीकडे पणजी हे शहर मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरत आहे, आणि म्हणूनच शहरात सध्या सांडपाण्याचं व्यवस्थापन हा एक गंभीर विषय ठरतोय.

या नवीन प्रकल्पाबद्दल बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की संपूर्ण स्वयंचलित व्हॅक्यूम सीवर नेटवर्क सिस्टम पर्यावरणाचे संरक्षण करत स्वच्छतेवर भर देईल आणि रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात मदत करेल. एकूण ८ कोटी ५२ लाख रुपयांचा हा प्रकल्प अरुंद भागांमध्ये जिथे सांडपाण्याचे व्यवस्थापन होऊ शकत नाही अशा भागांमध्ये सुरु केला जाईल. या प्रकल्पाच्या बजेटमध्ये पाच वर्षांच्या मेंटेनन्सचा खर्च देखील जोडण्यात आलाय.

हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), स्थानिक समुदाय आणि इतर संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. शहरातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आधुनिक सेवांचा लाभ मिळावा, स्वच्छ आणि स्मार्ट पणजी बनवण्यासाठी गोवा सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Paresh Joshi: धड पडेपर्यंत इतरांसाठी धडपडणारे, परक्यांसाठीही ईश्वर ठरलेले 'परेश जोशी'

'लोकांची घरां कोण मोडता तें हांव पळयता'; CM सावंतांचे विरोधकांना प्रत्त्युत्तर, बेकायदेशीर प्लॉटिंगवरून विधानसभेत वाद

Pigeon Feeding Ban: सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालावी, विजय सरदेसाईंची मागणी

Goa Assembly: गोमंतकीयांना मिळणार स्वस्त दरात मासळी, सरकार धोरणात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री

Sunburn Goa:"सनबर्न नाही तर दुसरं कोणीतरी येईल" पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT