Goa IPB 10 projects approval Dainik Gomantak
गोवा

445.24 कोटींच्या दहा प्रकल्पांना मंजुरी, 800 पेक्षा अधिक नोकऱ्या होणार तयार; CM प्रमोद सावंतांची माहिती

Goa IPB 10 projects approval: राज्‍य गुंतवणूक प्रोत्‍साहन मंडळाने (आयपीबी) बुधवारी ४४५.२४ कोटींच्‍या दहा प्रकल्पांना मंजुरी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍य गुंतवणूक प्रोत्‍साहन मंडळाने (आयपीबी) बुधवारी ४४५.२४ कोटींच्‍या दहा प्रकल्पांना मंजुरी दिली असून, त्‍यातून राज्‍यभरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ८०१ नोकऱ्या तयार होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

मंडळाने बुधवारी ज्‍या प्रकल्‍पांना मान्‍यता दिली, त्‍यात डीजेईएफ लेझर अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्‍या धारबांदोडा येथील, सिंजेंटा बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्‍या खोर्लीतील, बालाजी प्लास्टिक्सच्‍या तुयेतील, मिस्टिक बॅरेल्झ प्रा. लिमिटेडच्‍या पिसुर्लेतील, टाइनी टाइड व्हेंचर्सच्‍या होंड्यातील, प्रदीप तिवारी यांच्‍या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग या किटलातील, विजयानंद व्‍यंकटेश नाईक यांच्‍या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग या किटलातील, कॉन्स्ट्रक्स इन्फ्राच्‍या तुयेतील, रत्नाकर धुमे यांच्‍या पिसुर्लेतील आणि ह्यूजेस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्‍या नाकेरी येथील प्रकल्‍पांचा समावेश आहे.

या सर्व प्रकल्‍पांमुळे ८०१ नोकऱ्या निर्माण होणार असून, त्‍यामाध्‍यमातून राज्‍याला महसूल मिळण्‍यासह गोमंतकीय युवक–युवतींना रोजगार मिळण्‍याचीही आशा मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी व्‍यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

Iran Celebration: "ट्रम्प यांच्या पतनाची सुरुवात झाली!", मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर इराणमध्ये जल्लोष; हजारो लोक उतरले रस्त्यावर VIDEO

SCROLL FOR NEXT