Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: गुंतवणुकीच्या नावाखाली गोमंतकीयांची 20.83 कोटींची लूट, मायरन रॉड्रिग्जविरोधात आरोपपत्र दाखल; लवकरच सुरु होणार सुनावणी

Myron Rodrigues Against Charge Sheet Filed: राज्यात गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गोवा पोलिसांनी मडगाव सत्र न्यायालयात नवे आरोपपत्र सादर केले आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात गुंतवणुकीच्या नावाखाली झालेल्या कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गोवा पोलिसांनी मडगाव सत्र न्यायालयात नवे आरोपपत्र सादर केले. सुमारे 20.83 कोटी रुपयांच्या या फसवणुकीने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्जसह त्याच्या दोन्ही पत्नींचा समावेश असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. किरभाट-नुवे येथील रहिवासी असलेला मायरन रॉड्रिग्ज हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत, मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मायरन याने आपली पहिली पत्नी सुनिता भगवंत तन्नाई उर्फ सुनिता रॉड्रिग्ज आणि दुसरी पत्नी दीपाली परब उर्फ रुक्मिणी नाईक यांच्या संगनमताने हा फसवणुकीचा जाळे विणले होते. सुनिताला 7 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती, मात्र काही दिवसांनंतर तिला जामीन मंजूर झाला. दुसरी संशयित आरोपी दीपाली परब हिला मार्च 2025 मध्ये अटक करण्यात आली होती आणि अनेक महिने कोठडीत राहिल्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये तिला कडक अटींसह जामिनावर सोडण्यात आले. मात्र, मुख्य सूत्रधार मायरन अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

या तिन्ही आरोपींनी स्वतःला गुंतवणूक सल्लागार असल्याचे भासवून लोकांचा विश्वास संपादन केला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्यावर भरघोस परतावा मिळवून देऊ, असे प्रलोभन त्यांनी अनेक गुंतवणूकदारांना दाखवले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी आपली कष्टाची कमाई त्यांच्याकडे सोपवली. अशा प्रकारे या टोळीने विविध गुंतवणूकदारांकडून तब्बल 20.83 कोटी रुपये जमा केले. मात्र, जेव्हा परतावा देण्याची वेळ आली, तेव्हा या आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आणि मूळ रक्कम देण्यासही टाळाटाळ केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी तगादा लावला असता, मायरन याने त्यांना काही धनादेश (Cheques) दिले होते. परंतु, बँकेत पुरेसा निधी नसल्यामुळे हे सर्व धनादेश वटले नाहीत आणि गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसली गेली. रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे (Crime Branch) पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन मडगाव न्यायालयात हे सर्व पुरावे सादर केले आहेत. या मोठ्या आर्थिक घोटाळ्याची सुनावणी आता मडगाव (Margao) सत्र न्यायालयात लवकरच सुरु होणार असून, या प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Death: बॅटिंग करत होता अन् अचानक... LIVE सामन्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं क्रिकेटपटूचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Goa Drowning Death: पाय घसरला अन् घात झाला! रात्रीच्या वेळी मांडवी नदीत पडून ओडिसाच्या मच्छीमार मजुराचा दुर्दैवी अंत

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा या राशींसाठी ठरणार 'लकी'; लक्ष्मीची कृपा अन् घरात येणार पैसाच पैसा!

Bordem: बोर्डे भागात पाणीप्रश्‍न! जलवाहिनी फुटून पाणी गेले वाहून; गृहिणींची गैरसोय

VIDEO: 'सॉरी-सॉरी' म्हणत वैभव सूर्यवंशीचा कल्ला! World Cup जिंकताच भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT