Investment Promotion Board Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Job Opportunity: गोमंतकीयांना मिळणार दोन हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी, राज्यात 733 कोटींची गुंतवणूक

Investment Promotion Board Goa: गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत एकूण ९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सुमारे ७३३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २ हजार ३१९ रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत एकूण ९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये सुमारे ७३३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २ हजार ३१९ रोजगार संधी निर्माण होणार आहेत. मंजूर प्रकल्पांमध्ये औषध निर्मिती, गोदाम सुविधा, यंत्रसामग्री उत्पादन आणि पेय निर्मिती यांचा समावेश आहे.

मंडळाची ३८ वी बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी या प्रकल्पांमधून जास्तीत जास्त रोजगार स्थानिकांना मिळावेत, यावर भर दिला. मंडळावरील उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींना गोव्यातील (Goa) युवकांची कौशल्यवृद्धी करण्यासाठी सरकारी यंत्रणांशी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारने लॉजिस्टिक्स क्षेत्राला औद्योगिक दर्जा दिला आहे. त्याअंतर्गत एक्सप्रेस मशीन्स ॲण्ड स्काफोल्डींग या कंपनीला राज्यात नवीन मोठी गोदाम सुविधा निर्माण करण्यास आज गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली.

मंजूर प्रकल्पांमध्ये प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल कंपनीच्या जिलेट डायव्हरसिफाईड या उपकंपनीने मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट आणि फूड-ग्रेड सॉफ्टजेल कॅप्सूल्स उत्पादनासाठीचा प्रस्तावित प्रकल्‍प, झायडस लाईफसायन्सचा रेप्स्यूल्स उत्पादनाचा प्रकल्‍प आदींचा समावेश आहे.

केपे येथील इको-टुरिझम प्रकल्पाचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली असून, तो आता ‘इंडियन हॉटेल्स कॉर्पोरेशन’ ब्रॅण्डअंतर्गत कार्यरत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Road Accident: उन्नत मार्ग खुला होताच पहिला भीषण अपघात; पर्वरीत दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर! लेन बदलण्याच्या धोक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Strait Of Hormuz: अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' रोखण्यावरुन इराणची वॉशिंग्टनला खुली चेतावनी; पेझेश्कियान यांनी सुनावले खडे बोल

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

SCROLL FOR NEXT