Goa News | GIDC  Dainik Gomantak
गोवा

Goa News: GIDC चे 'सेझ' प्रकरणात तब्बल 17 कोटींचे नुकसान

Goa News: मुख्यमंत्र्यांनी स्वत: दखल घेतली असून सपूर्ण चौकशी केली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या (जीआयडीसी) हिशेबात सेझ प्रकरणी झालेल्या चुकीमुळे 17 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कॅग अहवालात उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची स्वेच्छा दखल घेतली असून ते चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

31 मार्च 2020 मध्ये कॅगच्या अहवालात हिशेबात झालेली चूक दाखविण्यात आली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. कॅग अहवाल सार्वजनिक लेखा समिती (पीएसी) समोर मांडला गेला आहे. समितीच्या शिफारशीवरून चौकशी होण्याची शक्यता आहे; कारण ही गंभीर बाब आहे.

हिशेबात झालेल्या चुकीमुळे जीआयडीसीने सेझ प्रकरण मिटविण्यासाठी पाच कंपनींना 17.32 कोटी रुपये अतिरिक्त दिल्याचे समजते. सेझ प्रकरणात 256.57 कोटी रुपये रक्कम कंपन्यांना मोबदला म्हणून देण्याचे निश्‍चित झाले होते.

त्यात सात सेझ जमिनी दिलेल्यांना बांधकाम परवाने शुल्क आणि परवाने शुल्काची पोचपावती देण्यात झालेल्या विलंबावर व्याज दिले जाईल, असे ठरले होते. जीआयडीसीने हिशेबात चूक केली; परंतु कायदेशीर मार्गाने ती दुरुस्त करण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे अतिरिक्त 17.32 कोटी रुपये कंपन्यांना देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पर्यटन हंगाम सुरळीत कर रे महाराजा!

Goa Weather: गोव्यात थंडी गेली कुठे? उष्म्याने नागरिक हैराण; रोगराई पसरण्याची भीती

Viresh Borkar: '..तर गोमंतकीयांसाठी जागा राहणार नाही'! जमीन संरक्षण विधेयकासाठी आंदोलन आवश्यक; आमदार बोरकर

Bhutani Project: 'परवाने रद्द होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच'; तब्येत बिघडली तरी 'भूतानी'विरुद्ध नाईक ठाम

जर्मन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याचा शेवट गोवा भेटीने! विद्यार्थ्यांशी साधला संवाद; भारताबाबत केले मोठे विधान

SCROLL FOR NEXT