Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपच्या गळाला गोव्यातील अपक्ष आमदार; 2027 ची विधानसभा BJP कडून लढण्याची व्यक्त केली इच्छा

Goa BJP Politics: माजी मंत्री आणि भाजप नेते पांडुरंग मडकईकर यांनी देखील यावेळी संतोष यांची भेट घेतली.

Pramod Yadav

Goa Assembly Election 2027

पणजी: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी मंगळवारी (०४ मार्च) केलेल्या गोवा दौऱ्याने राज्यात अनेक राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजपचे काही नेते नाराज आहेत तर काही अपक्ष नेत्यांनी आगामी २०२७ ची निवडणूक भाजपकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संतोष यांनी पणजीत घेतलेल्या भेटीगाठीनंतर राजकीय नेत्यांनी केलेल्या विधानांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

डिचोलीचे अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २०२७ ला भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे शेट्ये म्हणाले. मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर शेट्ये माध्यमांशी बोलत होते. संतोष यांच्या भेटीनंतर शेट्ये यांनी विधानसभेला अद्याप दोन वर्षांच्या अवधी असताना केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आले आहे.

अखिल भारतीय महिला मोर्चा संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात आलेल्या संतोष यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्यासह विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. माजी मंत्री आणि भाजप नेते पांडुरंग मडकईकर यांनी देखील यावेळी संतोष यांची भेट घेतली. भेटीनंतर मडकईकरांनी राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका देखील केली. भाजपने २०२७ ला उमेदवारी न दिल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा मडकईकरांनी दिला.

"गोव्यात काहीच व्यवस्थित सुरु नाहीये. मंत्री फक्त पैसे मोजण्यात व्यग्र आहेत. एक फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्याला १५ ते २० लाख रुपये लाच दिल्याचा खळबळजनक आरोप मडकईकरांनी केला. २०२७ ची निवडणूक भाजपकडून लढण्यास मी इच्छुक आहे. पण भाजने तिकिट नाकारल्यास काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड संपर्कात आहेत. योग्य निर्णय घेईन", असे मडकईकर म्हणाले.

बी. एल. संतोष यांच्या गोवा दौऱ्यामुळे राज्यातील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, या बैठकीत गेल्या सात ते आठ महिन्यांपासून भिजत पडलेला मंत्री मंडळ विस्ताराच्या मुद्यावर कोणतीच चर्चा झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. पण, संतोष यांच्या भेटीमुळे भविष्यात राज्यात होणाऱ्या विविध हालचालींसाठी ही नांदी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT