Goa BJP: संतोष यांच्या गोवा दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण! मंत्री, आमदारांच्या स्वतंत्र भेटीमुळे उलथापालथीची नांदी

BL Santosh Goa visit: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यामुळे अखेर राजकीय हालचाली गतिमान झाल्या.
B L Santosh Goa Visit
Damu Naik, B L Santosh Dainik Gomantak
Published on
Updated on

BL Santosh visit sparks political discussions in Goa BJP

पणजी: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या दौऱ्यामुळे अखेर राजकीय हालचाली गतिमान झाल्या. त्यांची मंत्री व आमदारांनी स्वतंत्रपणे भेट घेतल्याने येत्या काही दिवसांत होऊ शकणाऱ्या राजकीय उलथापालथीची ही नांदी मानली जात आहे.

संतोष यांच्या दौऱ्याविषयी भाजपकडून काहीच अधिकृतपणे सांगण्यात आले नव्हते. आज अखिल भारतीय महिला मोर्चा संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते गोव्यात आले असून त्यांच्या कोणाशीही भेटी ठरलेल्‍या नाहीत असे सांगण्यात आले.

असे असले तरी बांदोडा येथील बैठक आटोपून संतोष पणजीत आपले वास्तव्य असलेल्या हॉटेलात पोचताच अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चेला सुरवात झाली.

B L Santosh Goa Visit
B L Santosh Visit: भाजप नेत्यांची मंगळवारपासून कसोटी! राष्ट्रीय सचिव संतोष होणार गोव्यात दाखल; 'मंत्रिमंडळ' विषय ऐरणीवर

संतोष काल केरळमध्ये होते. तेथून रेल्वेने ते मडगाव येथे आले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे त्यांचे स्वागत केले. तेथून ते बांदोडा येथे संमेलनस्थळाची पाहणी करण्यासाठी गेले. या संमेलनाच्या आयोजनासाठी ४० सदस्यीय समिती स्थानिक नेते कार्यकर्त्यांतून निवडण्यात आली आहे. त्यांच्या बैठकीला संतोष यांनी संबोधित केले. या बैठकीला खासदार सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ व १४ मार्च रोजी बांदोडा येथे श्री महालक्ष्मी देवस्थान सभागृहात घेण्यात येणार आहे. विविध राज्यांच्या महिला मोर्चा प्रभारी व अध्यक्ष या संमेलनासाठी येणार आहेत. पुढील वर्षभरात संघटनात्मक कामाची दिशा या संमेलनात निश्चित केली जाणार आहे. या संमेलनासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या संमेलनाच्या तयारीचा आढावा संतोष यांनी घेतला आहे.

B L Santosh Goa Visit
Goa BJP: संतोष यांच्या गोवा दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल पुन्हा चर्चेत! कार्यकारिणीची होणार निश्चिती

१. बांदोडा येथे १३ व १४ मार्च रोजी होणाऱ्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी गोव्यात आलेले बी. एल. संतोष यांना अनेक नेते आज पणजीत भेटले.

२. एकेका नेत्यांनी व्यक्तिगतरीत्या या भेटी घेतल्याने सरकारच्या कारभाराविषयी त्यांनी जाणून घेतल्याचे मानले जात आहे.

३.भेट घेणाऱ्यांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांचा समावेश होता.

४. मुख्यमंत्री एकदा भेटून गेल्यानंतर पुन्हा संतोष यांची भेट घेण्यास आले. त्याबाबत विचारल्यावर ‘काय ना रे बाबा...’ असे उद्गार त्यांनी काढले.

५. संतोष गोव्यात दाखल झाल्यानंतर ते भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या निवासस्थानीही गेले होते. उद्या (ता.५) सकाळी ६ वाजता ते विमानाने दिल्लीस रवाना होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com