Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Forecast: उकाड्यापासून दिलासा मिळणार, गोव्यात आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता

Goa Weather Forecast: राज्यातील कडक ऊन आणि असह्य गर्मी यामुळे त्रस्त नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Weather Forecast

भारतीय हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सहा एप्रिल (शनिवारी) गोव्यातील विविध ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.

राज्यातील कडक ऊन आणि असह्य गर्मी यामुळे त्रस्त नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा पाऊस पूर्व मान्सूनच्या सरी असल्याचे सांगितले जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात 31 मार्च ते 05 एप्रिल या काळात हवामान कोरडे राहणार असून, येत्या तीन दिवसात तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही.

गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील मुरगाव आणि पणजीत सर्वाधिक 33.4 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. तर, 25.9 अंश सेल्सियस सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

मान्सूनपूर्व हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतसा गोव्यात पडणाऱ्या पावसाबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. साधारणपणे राज्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व सरी कोसळतात. दरम्यान, येत्या सहा एप्रिल रोजी राज्यातील विविध भागात हलक्या स्वरुपाचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी मान्सूनचा विशेषतः कोकण आणि गोवा प्रदेशांवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोव्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन अद्याप लांबणीवर असले तरी, केरळसारख्या राज्यांच्या तुलनेत राज्यात तुलनेने थंड तापमान जाणवत असल्याचे खात्याने नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT