Sand Mining | Goa News
Sand Mining | Goa News Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: म्हादई-खांडेपारमध्ये रेतीचा उपसा अमर्यादपणे सुरू आहे

दैनिक गोमन्तक

Sand Mining News: राज्यात सध्या बेकायदेशीर व्यवहारांना ऊत आला असून बंदी असलेल्या रेती आणि चिऱ्यांची वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. विशेष म्हणजे रेतीचा उपसा सध्या म्हादई आणि खांडेपार नदीतून अमर्यादपणे सुरू असून रात्रीच्यावेळेला सक्शन पंप लावून रेती खेचली जाते आणि थेट ट्रकात घालून ती रातोरात विकली जाते.

नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी पाहणी केली तर असे सक्शन पंप सापडतील अशी स्थिती आहे, पण झोपी गेलेल्या जागे कोण करणार, अशी प्रशासनाची स्थिती असल्यामुळे हे बेकायदेशीर व्यवहार सध्या सुरूच आहेत.

राज्यात रेती उत्खननाला पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी रेतीचा उपसा केला जातो, आणि रात्रीच या रेतीची वाहतूक केली जाते. रात्रीच्यावेळेला पोलिस व इतर संबंधित सुरक्षा यंत्रणेला चिरीमिरी देऊन हे सगळे व्यवहार होत असल्याने राज्यातील सुरक्षा यंत्रणेचे सध्या वाभाडे निघालेले आहेत.

विशेष म्हणजे खाण खाते आणि कॅप्टन ऑफ पोर्टचे कर्मचारी पाहणी करण्याचे नाटक करीत असल्याने हे सर्व प्रकार होत असल्याचे नदीकिनारी असलेल्या लोकांचे म्हणणे आहे.

खांडेपार व महादयी नदीत खांडेपार भाग ते पुढे वाघुर्मे व वळवई आणि त्यानंतर खांडोळा अशा ठिकाणी ही रेती उपसा जोरात सुरू आहे. रात्रीच्या वेळी सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. त्यामुळे नदीच्या किनारी भागाची धूप होत आहे.

नदीच्या कडा अनेक ठिकाणी या अमर्याद रेती उपसामुळे कोसळल्या असल्या तरी सरकारच्या संबंधित खात्याकडून डोळेझाक केली जात आहे. नदीच्या किनाऱ्यावरील कडा कोसळत असल्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे.

कायदेशीर कराच, पण...

  • रेतीचा उपसा कायदेशीर कराच, पण हा व्यवसाय कायदेशीर केला तरी रेतीच्या उत्खननावर मर्यादा लादणे कठीण होणार आहे. निर्बंध लादले तरी रेतीचा अमर्यादित उपसा काही थांबणार नाही, त्यामुळेच खनिज मालाच्या वाहतुकीप्रमाणे जीपीएस अथवा तत्सम यंत्रणा राबवणे गरजेचे आहे.

  • वास्तविक रेतीची सगळीकडे गरज आहे. सरकारी विकास प्रकल्पांनाही रेतीची गरज आहे, मात्र सध्या चोरीछुपे काढण्यात येणाऱ्या रेतीचे भाव गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकाला घर बांधणे मुश्‍किलीचे ठरले आहे. त्यामुळेच आता रेतीचा व्यवसायही कायद्याच्या कठोर चौकटीत यायला हवा.

तक्रारीनंतर खांडेपार येथे कारवाई

दोन महिन्यांपूर्वी खांडेपार येथे बेकायदा रेतीचा उपसा करणारा सक्शन पंप कॅप्टन ऑफ पोर्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला होता. केवळ तक्रारी केल्यानंतरच कारवाई होते की काय, असा सवाल सध्या नागरिकांकडून केला जात आहे.किती सक्शन पंप चालू आहेत, आणि किती होड्या भरून रेती नेली जाते, किती ट्रकातून रेतीची वाहतूक सुरू आहे, यावर कारवाई कोण करणार, असा सवाल लोकांकडून केला जात आहे.

"महादयी आणि खांडेपार नदीच्या पात्रात रात्रीच्यावेळी रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याचे आम्ही पाहिले आहे. या प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी संबंधित सरकारी यंत्रणेची आहे, पण सरकारी यंत्रणा गप्प राहते, याचे कारण सर्वांना माहीत आहे."

- सदानंद गावकर, उसगाव.

"रेतीचा व्यवसाय कायदेशीर करण्याची आज खरी गरज आहे. एखाद्या वस्तूचा काळाबाजार झाला म्हणजे साहजिकच त्याचे भाव वाढतात. नेमका तोच प्रकार रेतीच्या व्यवसायाबद्दल झाला आहे. सरकारने याप्रकरणी त्वरित कार्यवाही करून रेती व्यवसाय कायद्याच्या चौकटीत बसवायला हवा."

- रोहिदास नाईक, पाळी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT