Goa Illegal Mining: Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Mining: काणकोण येथील बेकायदा चिरेखाणीवर खाण खात्याची मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Illegal Stone Mining: काणकोण तालुक्यातील पर्येमळ-खोला परिसरात खाण खात्याने छापा टाकत विनापरवाना सुरू असलेले चिरे उत्खनन उघडकीस आणले.

Sameer Amunekar

पणजी – काणकोण तालुक्यातील पर्येमळ-खोला परिसरात खाण खात्यानं छापा टाकत विनापरवाना सुरू असलेले चिरे उत्खनन उघडकीस आणले. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पॉवर टिलर मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचं आढळून आलं.

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुमार चालवाडी (रा. बागलकोट, कर्नाटक), संतोष सुरीन (रा. झारखंड) आणि नारायण (रा.झारखंड) यांचा समावेश आहे. या तिघांवर सरकारचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

खाण खात्याच्या अधिकाऱ्यांना पर्येमळ-खोला भागात विनापरवाना चिरे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विशेष पथक तयार करून छापा टाकला. तपासादरम्यान, आरोपी हे कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय पॉवर टिलर मशीनच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणावर चिरे उत्खनन करत असल्याचं निदर्शनास आलं.

प्राथमिक अंदाजानुसार, या कारवाईत जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.

राज्यात अनेक ठिकाणी विनापरवाना खनिज उत्खनन होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्यामुळं खाण विभागानं अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT