Illegal Call Center Dainik Gomantak
गोवा

Illegal Call Center: अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या बेकायदेशीर 'कॉल सेंटर'चा पर्दाफाश, 6 जणांना अटक; सायबर पोलिसांची दक्षिण गोव्यात कारवाई

Goa Illegal Call Center Busted: अमेरिकेतील नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दक्षिण गोव्यातील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा सायबर गुन्हे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अमेरिकेतील नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दक्षिण गोव्यातील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा सायबर गुन्हे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या छाप्यात पोलिसांनी मुख्य सूत्रधार विश्वदीपसिंह जाधव (२९, गुजरात) याच्यासह त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या विशाल सिंग (२४, राजस्थान), हिमांशू प्रजापती (१९, गुजरात), तृषित सावंत (३९, महाराष्ट्र), मयूर सावंत (३६, राजस्थान) आणि धनराज वलेरा (२४, गुजरात) यांना अटक केली आहे. संशयितांकडून ८ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यात एका ठिकाणी ऑनलाइन बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची खात्रीशीर माहिती सायबर गुन्हे पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित परिसरात छापा टाकला.

यावेळी तिथे ‘पेडे’ नावाच्या बनावट कर्ज कंपनीचे एजंट बनून अमेरिकेतील नागरिकांना लुटण्याचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आले. हे संशयित या कर्ज देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवायचे.

अमेरिकेतील नागरिकांना त्वरित कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्यांना विविध प्रकारची ‘गिफ्ट कार्डस्’ खरेदी करण्यास भाग पाडत असत. या ‘गिफ्ट कार्डस्’ माध्यमातून ते अमेरिकन नागरिकांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरण्यात आलेले ६ लॅपटॉप, ६ हेडफोन, ६ ॲपल आयफोन आणि १ टीपी-लिंक राऊटर जप्त केला आहे.

अधिक तपास सुरू

सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक, योगेश खांडेपारकर, पोलिस कॉन्स्टेबल करोल इब्राहिम आणि अक्षय वेर्लेकर यांच्या पथकाने कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: पुन्हा विश्रांती! 15 ऑगस्टपर्यंत पाऊस नाही! हवामान विभागाचा अंदाज; राज्यात आतापर्यंत 61.20 इंचांची नोंद

Temple Theft: चोर आता देवालाही सोडेनात! नार्वे येथील मंदिरात चोरी; फंडपेटी फोडून रोकड लंपास; संशयितास कुठ्ठाळीतून अटक

Dhangar community: धनगर समाजाला आतातरी न्याय द्या! सांगेतील सभेत मागणी; समाजबांधवांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

EPFOच्या नावानं लिंक आली तर थांबा! PF खात्यातील पैशांवर सायबर गुन्हेगारांची नजर; एका चुकीमुळे खात्यातील पैसे होतील गायब

VIDEO: दोन कोलांट्या घेत जीप महामार्गाबाहेर... तांबोसेत भीषण अपघात; निपाणीतील पाच जखमी

SCROLL FOR NEXT