Goa IIT Dainik Gomantak
गोवा

Goa IIT: गोवा आयआयटीसाठी 3 जागा निश्चित! संजीवनी, केरी, उसगावातील जागांचा पर्याय

Goa IIT Project: गोवा आयआयटी स्थापन होऊन १० वर्षे उलटली तरी या संस्थेला अजून आपली कायमस्वरूपी जागा मिळालेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोवा आयआयटी स्थापन होऊन १० वर्षे उलटली तरी या संस्थेला अजून आपली कायमस्वरूपी जागा मिळालेली नाही. या परिस्थितीत आता तीन नव्या जागा या प्रकल्पासाठी निश्चित केल्या असून या तिन्ही जागा फोंडा तालुक्याला जवळ आहेत.

सांगे येथे आयआयटी प्रकल्प सुरू स्थापण्याचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर या प्रकल्पासाठी धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याची जागा पाहण्यात आली होती. तसेच आता उसगाव येथील कॉमुनिदादची जागा आणि केरी, फोंडा पठारावरील सेझसाठी संपादित केलेल्या जागेचाही पर्याय खुला ठेवला आहे.

आतापर्यंत चार जागा बदलल्या

मागच्या वर्षी या प्रकल्पासाठी फोंडा तालुक्यातील कोडार कॉमुनिदादाच्या मालकीच्या १४ लाख चौरस मीटर जागा पाहिली होती. पण स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला होता.

या प्रकल्पासाठी सर्वात आधी म्हणजे २०२१ साली मेळावली सत्तरी येथील जागा पाहिली होती. पण स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत हा प्रकल्प उभारण्यास विरोध करताना फार मोठे आंदोलन केले होते.

त्यानंतर सांगे आणि रिवण येथील जागा या प्रकल्पासाठी पाहण्यात आल्या होत्या. मात्र तिथेही स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता.

कायमस्वरूपी जागा उपलब्ध करणार

गोवा आयआयटीची स्थापना २०१६ मध्ये झाली होती. पण या संस्थेला अजून कायमस्वरूपी जागा मिळाली नसल्याने फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेत सुरू आहे. या संस्थेला चालू वर्षात कुठल्याही परिस्थितीत कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डोळ्यांसमोर ठेवले असून त्यासाठीच हा तीन जागांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT