Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM: याचवर्षी होणार IIT संकुलाची पायाभरणी, पेडणे ते काणकोणपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याचाही मानस

Goa CM Pramod Sawant: 'विकसित भारत २०४७'च्या दिशेने हे दूरदृष्टीचे एक पाऊल आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात आयआयटी शैक्षणिक संकुल उभारण्यासाठीची पायाभरणी याचवर्षी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (०४ फेब्रुवारी) मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर दिली. याच वर्षी पेडणे ते काणकोणपर्यंत स्थानिकांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा विविध क्षेत्रांमध्ये विकासाच्या उपाययोजना घेऊन गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी यांच्यावर केंद्रित आहे. हा मध्यमवर्गीयांसाठी लाभदायक असून सर्व क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 'विकसित भारत २०४७'च्या दिशेने हे दूरदृष्टीचे एक पाऊल आहे.

एअर कार्गोसाठी साहाय्य योजनेमुळे गोव्याला लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी संधी निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिक वाहने, जहाज उद्योग, मासे प्रक्रिया उद्योग यासाठी कस्टम ड्युटी कमी केल्याने राज्याच्या विविध उद्योगांना मदत होणार आहे. जल जीवन मिशनचा विस्तार केल्याने गोव्याला जलपुरवठा सुधारण्यासाठी मदत मिळेल. हा अर्थसंकल्प मध्यमवर्ग, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, शेतकरी आणि नवीन तंत्रज्ञान यांना चालना देणारा आहे. गोव्यासाठी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, रेल्वे, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रांमध्ये मोठी संधी आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

१) किसान क्रेडिट कार्ज कर्ज मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढली, यामुळे १७,५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल.

२) सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी कर्ज २ मर्यादा ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपयांवर नेल्याचा गोव्यातील व्यावसायिकांना फायदा होईल.

३) आदिवासी महिला उद्योजकांसाठी नवीन योजनेतून साहाय्य मिळेल.

४) सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये ४ डे केअर के सर सेंटर गोव्यासाठीही लाभदायक आहे.

५) पंतप्रधान स्वनिधी योजनेत सुधारणा करण्यात आली आहे.

६) वाढीव क्रेडिट मर्यादा, क्रेडिट कार्ड यामुळे ३ हजारपेक्षा जास्त स्ट्रीट व्हेंडर्सना फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT