IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

'IFFI 2024' च्या नोंदणीला जोरदार प्रतिसाद! गोवा विशेष विभागासाठी प्रवेशिका आमंत्रित; इथे करा नोंदणी..

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून, नऊ दिवसांत १४०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. तसेच गोवा विभागासाठी मनोरंजन संस्थेने चित्रपट प्रवेश आमंत्रित केले आहेत.

वार्षिक चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणार असून, विशेष गोवा विभाग कोकणी आणि मराठी फिचर आणि नॉन-फिचर फिल्म्ससाठी प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत. प्रवेशिका ३० ऑक्टोबरपर्यंत जमा करायच्या आहेत. खालील संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध आहेत.

https://esg.co.in/entries-for-special-goan-section-feature-non-feature-films-for-the-55th-iffi-2024/

चित्रपट प्रेमींकरिता प्रतिनिधी नोंदणीसाठी जीएसटीसह एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, विद्यार्थी वर्गास ही नोंदणी मोफत आहे. फिल्म फेस्टिव्हलच्या बरोबरीने चालणाऱ्या एनएफडीसी फिल्म बाजारच्या १८ व्या आवृत्तीचीही नोंदणी सुरू झाली आहे. filmbazaarindia.com या संकेतस्थळावर प्रतिनिधी नोंदणीसाठी १८ हजार रुपये मोजावे लागतील. २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी २० हजार रुपये, तर ऑन द स्पॉट नोंदणी १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत प्रति प्रतिनिधी शुल्क २५ हजार रुपये आकारले जाईल. विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असून, १९ नोव्हेंबरपर्यंत प्रति विद्यार्थीसाठी ९ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalarang 2024: गोव्यात पाच दिवस रंगणार ‘कलारंग महोत्सव’! 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हस्ते होणार उदघाट्न

Goa Recruitment: शाळांसाठी शिक्षण खात्याच्या मीडिया साइटवर भरतीची जाहिरात अपलोड करणे आवश्यक !!

Sao Jose De Areal: ‘स्वच्छता ही सेवा!’ 'सां जुझे दी आरियाल'चा जागृती कार्यक्रम; कृषी, मच्छीमारी, पशुसंवर्धन खात्यांचा सहभाग

Mayem News: भाजीचे मळे फुलणार, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू येणार; मये होणार ‘कृषी’समृद्ध

Moti Dongor: 'मोती डोंगर'बाबत काय म्हणाले दिगंबर कामत? पहा...

SCROLL FOR NEXT