IffI 2022 Goa |Goa News  Dainik Gomantak
गोवा

IffI 2022 Goa Grand Opening: चंदेरी दुनियेचा पेटारा आज उघडणार

IffI 2022 Goa Grand Opening: अजय देवगण, वरुण धवन, प्रभू देवा यांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक

IffI 2022 Goa Grand Opening: जगभरातील चंदेरी दुनियेचा मानबिंदू असलेल्या भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा 79 देशांतील तब्बल 280 चित्रपटांसह सुमारे 500 चित्रपटांच्या रिल पुढील आठवडाभर रसिकांसाठी खुल्या होतील.

इंडियन पॅनोरमा विभागात देशभरातील 45 चित्रपटांचे प्रदर्शन होत असून यात मराठी, कोकणीसह अन्य भाषांतील चित्रपट रसिकांना पाहता येतील. भारताचा 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी, आजपासून 28 नोव्हेंबरदरम्यान होत आहे.

महोत्सवाचे उदघाटन संध्याकाळी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. यासाठी जगभरातील सुमारे 300 पाहुण्यांना निमंत्रित केले आहे. देशी सेलिब्रिटींची संख्याही मोठी आहे.

महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सिनेस्टार अजय देवगन, सुनील शेट्टी, प्रभू देवा, वरुण धवन, सारा अली खान, कार्तिक आर्यन, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, परेश रावल, इलियाना डिक्रूझ, यामी गौतम यांच्या उपस्थितीत होईल.

महोत्सवाच्या उदघाटनावेळी रंगारंग कार्यक्रमात मराठी सिनेतारका अमृता खानविलकर आणि सहकाऱ्यांचा सहभाग असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या ‘अल्मा ॲण्ड ऑस्कर’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल, तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या ‘परफेक्ट नंबर’ या चित्रपटाने सांगता होणार आहे. यंदा फिल्म बाजारमध्ये अनेक नवीन उपक्रम राबवले जात असून चित्रपटांचे प्रदर्शन, नव्या दिग्दर्शकांकरिता मास्टर क्लासेस, चित्रपटांच्या खरेदी-विक्रीसाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठीचे ‘बायर-सेलर मीट’ असे अनेक उपक्रम होत आहेत.

यंदा प्रथमच या महोत्सवाचा आनंद राज्यातील जनतेला घेता यावा, यासाठी ठिकठिकाणी कॅरावॉनच्या साहाय्याने चित्रपटांचे प्रदर्शन होईल. याबरोबरच मिरामार किनारा, रवींद्र भवन मडगाव येथेही चित्रपटांचे प्रदर्शन होईल. यावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रयत्नातून रिस्टोर्ड क्लासिक्सचे 4 चित्रपट रसिकांना पाहता येतील.

कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार

यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आशा पारेख यांच्या यांच्या तिसरी मंजल, दो बदन आणि कटी पतंग या चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार यंदा स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना देण्यात येईल. यंदा फ्रान्स हा स्पॉटलाईट देश असून कंट्री फोकस पॅकेजअंतर्गत फ्रान्सच्या 8 चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT