Goa IAS Officers Transfer News| Goa Police Transfer News Updates
Goa IAS Officers Transfer News| Goa Police Transfer News Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात प्रशासकीय खांदेपालट, बड्या अधिकाऱ्यांची बदली

दैनिक गोमन्तक

पणजी : स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा देत नव्याने सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. अशातच आता प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठे बदल झाले असून केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने आयएएस व आयपीएस विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात गोव्यातून वेगवेगळ्या राज्यांत तर ॲग्मूट केडरमधून अनेक नव्या अधिकाऱ्यांना गोव्यात पाठवण्यात आले आहे.

योगायोगाने गोव्यातून बाहेर गेलेल्या संदीप जॅकीस आणि बॉस्को जॉर्ज या गोमंतकीय अधिकाऱ्यांना परत मायभूमीत सेवा करण्याची संधी दिली आहे. जॅकीस हे प्रशासकीय अधिकारी असून जॉर्ज हे पोलिस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना गृह मंत्रालयाने केलेल्या या बदल्या अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरल्या असून राज्याचे प्रशासन गतिमान करण्यासाठी या बदल्या केल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातून बदली झालेले पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार यांना गोवा पोलिस सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने ॲग्मूट केडरमधील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांंचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये पाच आयएएस दिल्लीत तर त्यांच्या जागी चारजण गोव्यात आले आहेत. आयपीएसमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची दिल्लीला बदली झाली असून दोघे गोव्यात आले आहेत. 11 नगरनियोजक आणि उपनगरनियोजकांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे.

ॲग्मूट आयएएस केडरच्या 1997 बॅचचे व्ही. चंदावेलू, संजीव अहुजा (2008), संदीप जॅकीस (2009), सुभाष चंद्रा (2009) यांची दिल्ली येथून गोव्यात बदली झाली आहे, तर गोव्यातील संजय गिहार (2008), तारीक थॉमस (2011), चोकाराम गर्ग (2011), विवेक एच. पी. (2016) व हेमंत कुमार (2013) यांची दिल्ली येथे बदली झाली आहे. एग्मूट आयपीएस केडरच्या परमादित्य (2005) यांची गोव्यातून दिल्ली येथे तर अरुणाचल प्रदेशमधील आयपीएस बॉस्को जॉर्ज तसेच चंदीगढ येथील ओमवीर सिंग (2004) यांची गोव्यात बदली झाली आहे.

येत्या 30 एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्या एस. एम. बायकोड यांची मुख्य नगरनियोजकपदी वर्णी लावली आहे. इतर अधिकाऱ्यांमध्ये आर. एम. बोरकर (मडगाव), वर्तिका डागूर (म्हापसा), विनोद कुमार चंद्रा (सदस्य सचिव दक्षिण पीडीए), संदीप सुर्लकर (मडगाव), के. अशोक कुमार (तिसवाडी), प्रकाश बांदोडकर (पेडणे), जयदेव हळदणकर (म्हापसा), शिवप्रसाद मुरारी (डिचोली), संपूर्ण भगत (जीआयडीसी व रेरा) व युगंधराज रेडकर (केपे) यांचा समावेश आहे.

सध्या आरोग्य आणि वनमंत्री विश्‍वजित राणे हे आक्रमक बनले आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे काही आयएएस अधिकाऱ्यांनी गोव्यातून बदल्या करून घेतल्या आहेत. नगरनियोजन खात्यातील बदली झालेल्या नगरनियोजक व उपनगर नियोजकांचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेतल्या. या भेटींनंतर संध्याकाळीच गृहमंत्रालयाने आपल्या खात्यांत येणाऱ्या विविध आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रसाद लोलयेकर यांच्याकडे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) कार्यकारी संचालक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. राज्य प्रशासनातर्फे बुधवारी यासंबंधी आदेश काढण्यात आला. लोलयेकर उच्च शिक्षण संचालकही आहेत. 31 जानेवारी रोजी वसंत प्रभुदेसाई यांच्या सेवानिवृत्तीनंतर गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालकपद रिक्त होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Goa Today's Live News: कुर्टी-फोंड्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, नऊ लाखांचे नुकसान

चांदीने मे महिन्यात केला मोठा रेकॉर्ड, गुंतवणूकदार ‘मालामाल’; सेन्सेक्स, सोने अन् बिटकॉइनलाही सोडले मागे

Valpoi News : वाळपईतील सरकारी विद्यालयाचा ८४ टक्के निकाल

SCROLL FOR NEXT