Goa - Hyderabad Accident  Dainik Gomantak
गोवा

हैदराबादला परतणाऱ्या पर्यटकांवर काळाची झडप; बसचा अपघात नेमका कसा घडला?

कर्नाटकातील कमलापूर, गुलबर्गा येथे गोवा - हैद्राबाद बस आणि मालवाहू वाहनांमध्ये आज भीषण अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातील कमलापूर, गुलबर्गा येथे गोवा - हैद्राबाद बस आणि मालवाहू वाहनांमध्ये आज भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 10 जणांचा जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवाय 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ( Goa - Hyderabad Accident)

अपघात नेमका कसा झाला?

हैदराबाद येथील अर्जुन कुमार आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी कुटुंबियांसह गोव्यात आले होते. गोव्यात आपल्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी करून ते परतत असताना कमलापूर, गुलबर्गा येथे त्यांच्या बसचा अपघात झाला. या सेलिब्रेशनमध्ये कुटुंबीय आणि मित्रमंडळींना सहभागी करता यावं म्हणून त्यांनी खास बसही केली होती.

पोलीस अधीक्षक इशा पंत यांनी दिलेल्या माहितीतून अपघताचे नेमके कारण समोर आले आहे. गोव्याहून हैदराबादकडे निघालेली बसची कमलापूर येथे एका मालवाहू लॉरीशी जोरदार धडक बसली. दोन्ही वाहनांची टक्कर झाल्यानंतर बस काही अंतरावर गेली, उलटली आणि बसला आग लागली.

या भीषण आगीमध्ये 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शिवाय 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये एकूण 28 जण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस झोपेच्‍या मोडमध्‍ये

Arvind Kejriwal Mayem: '..तर मयेवासीयांची पारतंत्र्यातून मुक्तता'! जमीन मालकी हक्कावरुन काय म्हणाले केजरीवाल? Video

Varsha Usgaonkar: 'गोवा हे माझे घर... गोमंतकीय ही माझी माणसे'! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी उधळली स्तुतीसुमने

Narendra Modi: गोव्याच्या श्रुती आणि रोहितने जिंकले PM मोदींचे मन! म्हापसा ITIचे टॉपर्स; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात गौरव

‘तुला गोव्‍याचा राखणदार व्‍हायचे आहे का'? चाकू दाखवला, मारायला सुरुवात केली; हल्ल्‍यादिवशी नेमके काय घडले? काणकोणकरांनी दिला जबाब

SCROLL FOR NEXT