Hotels Near Goa Airport  Dainik Gomantak
गोवा

Goa Hotels: दाबोळी एअरपोर्टजवळ 'कोझी' आणि 'कम्फर्टेबल' हॉटेल शोधत आहात?

Affordable Goa Hotels: प्रवास केल्यानंतर नेहमीच आरामदायक आणि सोयीस्कर ठिकाणच्या आपण शोधात असतो

Akshata Chhatre

Hotels Near Dabolim Airport: तुम्ही गोव्यात पर्यटनासाठी जाण्याच्या विचारात आहात? सध्या गोव्यात गरमीचं प्रमाण बरंच वाढलंय, त्यामुळे विमानतळाच्या जवळच काही आरामदायक राहण्याची सोय झाली तर? आज आम्ही तुम्हाला दक्षिण गोव्यात उतरल्यानंतर दाबोळी विमानतळाजवळ असलेल्या काही हॉटेल्सबदल माहिती देणार आहोत. प्रवास केल्यानंतर नेहमीच आरामदायक आणि सोयीस्कर ठिकाणच्या आपण शोधात असतो आणि असेच तीन उत्तम पर्याय आज पाहूयात..

गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी दाबोळी विमानतळाजवळ आरामदायी आणि सोयीस्कर ठिकाणी मुक्काम करता यावं म्हणून काही उत्तम हॉटेल्स चालवली जातायत. विमानतळाजवळची ही ठिकाणे प्रवाशांना आरामदायी अनुभव देतात, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुखकर होतो.

१. कोकोनट क्रीक

विमानतळापासून अंदाजे ५ किमीच्या अंतरावर असलेल्या या हॉटेलमध्ये पर्यटकांची उत्तम सोय केली जाते. ज्या पर्यटकांची पहाटे किंवा रात्री उशिराची विमानं उतरणार असतात त्यांच्यासाठी हे ठिकाण विशेष फायदेशीर ठरतं.

या ४.५-स्टार हॉटेलमध्ये उत्तम खोल्या, मोठा स्विमिंग पूल आणि अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहेत. तसेच, गरज असल्यास विमानतळावर आणि विमानतळावरून पुन्हा हॉटेलवर येण्यासाठी टॅक्सी सेवा सुद्धा उपलब्ध आहे.

२. क्वीनी:

विमानतळापासून अंदाजे १० किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले क्वीनी व्हॅलीचं विहंगम दृश्य दाखवतं. शहराच्या गजबजीपासून दूर शांत ठिकाणी राहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे.

या ३-स्टार हॉटेलमध्ये आवश्यक सुविधा आणि स्विमिंग पूल आहे. सध्या हॉटेलचे रेस्टॉरंट सुरू नसले तरी, ऑनलाइन आणि थेट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

३. स्टोन वॉटर:

विमानतळापासून अंतर अंदाजे १५ किमी अनंतरवर असलेलं हे हॉटेल इको-रिसॉर्ट म्हणून ओळखलं जातं. इथे तुम्हाला आधुनिक लक्झरी आणि स्टायलिश डिझाइनचे मिश्रण पाहायला मिळेल. या हॉटेलमध्ये आलिशान कॉटेज-शैलीतील खोल्या, दोन मोठे स्विमिंग पूल आणि एक उत्कृष्ट रेस्टॉरंट आहे.

विमानतळापासून थोडे दूर असले तरी, शांत वातावरण आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांजवळ असल्याने हे ठिकाण अतिशय फायदेशीर ठरतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT