Baby Dainik Gomantak
गोवा

Baby swap Goa: मुलगी नव्हे मुलगा होता! दक्षिण गोवा रुग्णालयात बाळाची आदला - बदली झाल्याचा आईचा आरोप

South Goa district hospital: महिलेने मंगळवारी सी - सेक्शनद्वारे स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

Pramod Yadav

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात बाळाची आदलाबदली झाल्याचा आरोप बाळंतीण महिलेने केला आहे. महिलेने मुलगी नव्हे तर मुलाला जन्म दिल्याचा दावा करत तिचा बाळ बदलले असल्याचा आरोप तिने केला आहे. मंगळवारी (०८ एप्रिल) रोजी हा प्रकार उघडकीस आला.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मंगळवारी एका महिलेने बाळाला जन्म दिला. दरम्यान, बाळाची आदला - बदली केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने जन्म दिलेले बाळ मुलगी नव्हे तर मुलगा होते, असा दावा करत तिने हा आरोप केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, महिलेने केलेले आरोप रुग्णालयाने फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार अशाप्रकारे बाळाची आदला -बदली झालेली नाही. तरी देखील याबाबत विभागीय चौकशी केली जाईल, अशी माहिती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी टाईम्सला दिली आहे.

महिलेने मंगळवारी सी - सेक्शनद्वारे स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. महिलेने याप्रकरणी शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलिस तक्रार दाखल केली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT