Goa High Court translating Judgments into Konkani and Marathi: Dainik Gomantak
गोवा

Goa High Court: उच्च न्यायालयाकडून निकालांचे कोकणी, मराठीत भाषांतर करण्यास प्रारंभ

निकालांच्या अनुवादासाठी त्रिस्तरीय प्रणाली

Akshay Nirmale

Goa High Court translating Judgments into Konkani and Marathi: गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या निकालांचे कोकणी आणि मराठीत भाषांतर करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून लोकांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजावे. अनुवादासाठी न्यायालयाने त्रिस्तरीय प्रणाली स्वीकारली आहे.

आधी महत्त्वाच्या निकालांचे भाषांतर करण्यास प्राधान्य दिला जात आहे. गोव्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचेही न्यायालय भाषांतर करणार आहे.

आतापर्यंत उच्च न्यायालयाचे तीन निकाल कोकणी भाषेत आणि तीन मराठीत अनुवादित झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक निकालाचे भाषांतर करण्याचे लक्ष्य असल्याचे अधिकारी सांगतात.

असे आहेत निकालाच्या अनुवादाचे टप्पे

निकालांचे भाषांतर करण्याची पहिली पायरी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. हे 100 टक्के अचूक नसते. केवळ 60 टक्के योग्य असू शकते. कारण कोंकणीमध्ये काही कायदेशीर शब्दांना पर्यायी शब्दच नाहीत.

भाषांतरातील चुका कमी करण्यासाठी एक कोकणी शब्दकोष तयार केला जात आहे. हा शब्दकोष कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर अपलोड करता येईल. तथापि, या शब्दकोषासाठी काही काळ लागेल.

सध्या, निकालांचे कोकणी आणि मराठीत भाषांतर केल्यानंतर ते दुरुस्त्यांसाठी अधिकृत भाषा संचालनालयाकडे पाठवले जातात. एकदा सुधारणा केल्यावर, ते निवृत्त न्यायाधीशांच्या पॅनेलसमोर ठेवले जाते जे उच्च न्यायालयात परत पाठवण्यापूर्वी भाषांतर तपासतील.

काय म्हणाले होते सरन्यायाधीश?

काही काळापुर्वी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले होते की, प्रत्येक भारतीय भाषेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या अनुवादित प्रती प्रदान करणे, हे सुप्रीम कोर्टाचे मिशन आहे.

जोपर्यंत आम्ही आमच्या नागरिकांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही करत असलेले काम 99 टक्के लोकांपर्यंत पोहोचणार नाही, असे ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT