Goa Bench Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa High Court Shivaji Maharaj statue: ‘एमपीए’च्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीरपणे उभारल्याचा दावा करत ‘एमपीए’ने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) हेडलँड सडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादग्रस्त पुतळ्याबाबत पर्यायी जागा सुचवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह स्थानिकांना दिले आहेत.

या पुतळ्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आमदारांसह स्थानिकांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ जुलै रोजी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी न्यायालयासमोर हस्तक्षेप याचिका दाखल करून आपली बाजू मांडली.

‘एमपीए’च्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीरपणे उभारल्याचा दावा करत ‘एमपीए’ने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पुतळा हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा तेथून हटविल्यानंतर तो नेमका कुठे हलविला जाईल आणि कुठे सुरक्षित ठेवला जाईल, हा एक संवेदनशील मुद्दा आहे.

न्यायालयाने प्रतिवादींना पर्यायी जागा सुचविण्यास सांगितल्यामुळे आता पुढील सुनावणीत शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखून पुतळ्यासाठी दुसरी योग्य व अधिकृत जागा कोणती असू शकते, यावर मुख्य चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या हेडलँड सडा येथील जमिनीवर फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, एमपीए प्रशासनाने या जागेवर पुतळा बसविण्यास कोणतीही अधिकृत परवानगी दिली नसल्याचे सांगत हा पुतळा बेकायदेशीर ठरवला आणि न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने यापूर्वी हा पुतळा हटविण्याचे आदेश दिले होते..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT