Goa High Court | Waste Management Dainik Gomantak
गोवा

High Court on Waste Management: कचरा व्यवस्थापनात निष्क्रियता! सेंट लॉरेन्स व भाटी पंचायतीला न्यायालयाने खडसावले

पाच लाख भरा; अन्यथा तुरुंगवास

दैनिक गोमन्तक

High Court on Waste Management: राज्यात पालिका व पंचायत क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने 2007 साली स्वेच्छा दखल घेऊन पालिका व पंचायतींना धारेवर धरले आहे.

सेंट लॉरेन्स व भाटी पंचायतीला अवमान नोटिसा बजावूनही कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन सुविधा (एमआरएफ) उभी करण्यात निष्क्रियता दाखवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने 5 लाख रुपये जमा करा अन्यथा कोलवाळ कारागृहात जाण्याची तयारी ठेवा असे खडसावले आहे.

या दोन्ही पंचायतीच्या सरपंच व सचिवांना पंचायतीला दिलेल्या अवमान नोटिशीला उत्तर देण्यास उद्या 14 जूनला न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी एमआरएफ सुविधा न उभारलेल्या सेंट लॉरेन्स तसेच भाटी या दोन्ही पंचायतींविरुद्ध अवमान नोटीस बजावली होती. या दोन्ही पंचायतींच्या सरपंचांनी कायमस्वरूपी सुविधा उभी करण्याची लेखी हमीही न्यायालयाला दिली होती.

आज स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी सेंट लॉरेन्स पंचायतीच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर लोटांगण घालत येत्या 15 दिवसांत ही सुविधा पूर्ण करण्यात येईल अशी बाजू मांडली.

त्यांची ही बाजू फेटाळून लावून उच्च न्यायालयाने पंचायतींनी सुविधा उभारण्यास केलेल्या निष्क्रियतेबाबत गंभीर दखल घेतली.

पंचायत सरपंच व उपसरपंचांनी 5 लाख रुपये जमा करून त्यांना बजावलेल्या अवमान नोटिशीबाबत बाजू मांडावी अन्यथा कोलवाळ येथील कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी असे दोन पर्याय त्यांच्यासमोर ठेवले.

न्यायालयात उपस्थित असलेल्या सेंट लॉरेन्स पंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्याशी त्यांच्या वकिलांनी चर्चा करून कोणता पर्याय मान्य आहे हे आताच सांगा असे सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT