Tarun Tejpal Case Update Dainik Gomantak
गोवा

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Tarun Tejpal Case Update: २१ मे २०२१ रोजी म्हापसा येथील सत्र न्यायालयाने ‘तहलका’ मासिकाचे तत्कालीन संपादक-इन-चीफ तरुण तेजपाल यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: २०१३ मधील कथित बलात्कार प्रकरणात तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या अपिलावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. \

२१ मे २०२१ रोजी म्हापसा येथील सत्र न्यायालयाने ‘तहलका’ मासिकाचे तत्कालीन संपादक-इन-चीफ तरुण तेजपाल यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती. नोव्हेंबर २०१३ मध्ये बांबोळी येथील एका हॉटेलमधील कार्यक्रमादरम्यान आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

सत्र न्यायालयाच्या निकालावर त्यावेळी कायदेतज्ज्ञ आणि महिला संघटनांनी मोठी टीका केली होती. गोवा सरकारने या निकालाला ‘कायदेशीरदृष्ट्या अयोग्य’ समजून उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उद्या शुक्रवारी देखील युक्तिवाद होणार आहे. सरकारतर्फे बाजू मांडताना भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की, सत्र न्यायालयाने महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

कथित अत्याचारानंतर पीडितेने पुन्हा लिफ्टमध्ये जाणे हे तिला धक्का बसल्यामुळे झाले होते असे सरकारी पक्षाने स्पष्ट केले आहे. दरम्‍यान, सॉलिसिटर जनरल मेहता यांनी न्यायालयासमोर असाही दावा केला की, सत्र न्यायालयाच्या निकालात आरोपीऐवजी पीडितेच्याच वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, जे पूर्णपणे चुकीचे आहे.

सरकारने न्यायालयात मांडलेले मुद्दे

पीडितेने कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी निरो यांना मदत करणे सुरू ठेवले होते, कारण तिला तिच्या कामाची जबाबदारी पूर्ण करायची होती.

पीडितेने पोलिसांत तक्रार देण्यास उशीर केला, कारण तिला तिची नोकरी गमावण्याची भीती होती.

मीडियामध्ये बदनामी होईल किंवा पीडितेचे चारित्र्यहनन होईल, या भीतीने तिने सुरुवातीला कंपनीत तक्रार केली.

आर्थिक चणचण असतानाही तिने नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय तिच्या आरोपांची सत्यता सिद्ध करतो.

घटनेनंतर लगेचच पीडितेने काही सहकाऱ्यांकडे या लैंगिक अत्याचाराबद्दल तक्रार केली होती, जे तिची विश्वासार्हता अधोरेखित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT