Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

World Heritage Sites Goa: 'सरकारचा हा निर्णय म्हणजे देवावर कर लादण्यासारखा'; मॉन्ते कॅपेलमध्ये 50 रुपये प्रवेश शुल्कावरून वाद

Our lady of Mount Chapel: सेव्ह ओल्ड गोवा अॅक्शन कमिटीने या कॅपेलमधल्या प्रवेश शुल्काला विरोध केला आहे

Akshata Chhatre

Goa World Heritage Sites Entry Fee

पणजी: गोव्यातील वारसा स्थळांवर ५० रुपयांचे प्रवेश शुल्क लागू केले जाईल अशी माहिती काही दिवसांपूर्वी पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली होती. यांपैकीच एक म्हणजे अवर लेडी ऑफ मॉन्ते कॅपेल. मात्र 'सेव्ह ओल्ड गोवा अॅक्शन कमिटी'ने या कॅपेलमधल्या प्रवेशासाठी लावलेल्या प्रवेश शुल्काला विरोध केला आहे.

गोवा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते. समुद्रकिनारे आणि पार्टी वगळल्यास गोव्यात काही ऐतिहासिक जागा देखील आहेत जिथे पर्यटक आवर्जून भेट देतात. पुरातत्व विभागाने तयार केलेल्या यादीत एक नाव अवर लेडी ऑफ मॉन्ते कॅपेल हे देखील आहे.

मात्र मॉन्ते कॅपेल हे एक उपासनेचे ठिकाण असल्याने इथे दरदिवशी अनेक भक्त भेट देतात, तसेच दर महिन्याच्या ८ तारखेला येथे नियमितपणे चर्च सेवा आयोजित केली जाते, त्यामुळे येणाऱ्या भाविकांसाठी हे काम खर्चिक होईल आणि भक्तांना सेवांमध्ये सहभागी होण्यास अडथळा निर्माण करेल असे म्हणत कमिटीने या निर्णयाला विरोध दर्शनवण्यास सुरुवात केली आहे.

कमिटीने गोव्याचे मुख्यमंत्री आणि पुरातत्व व अभिलेखागार संचालकांना पाठवलेल्या पत्रात ही भूमिका मांडली आहे. निवेदन देण्यामागील भूमिका सांगताना समितीचे सदस्य पीटर व्हिएगस म्हणाले, जुने गोवा येथील मॉन्ते कॅपेलमध्ये जाण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारण्याचा जो सरकारने निर्णय घेतला आहे, तो योग्य नाही.

जुने गोवा येथील शव प्रदर्शन सोहळा नुकताच संपला आहे. तत्पूर्वी सरकारने वारसा स्थळे, धार्मिक स्थळे आणि स्मारकांवर जाण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन त्याची अधिसूचना काढली. जुने गोवे येथे शुल्क आकारले जाऊ नये, अशी आमची मागणी आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे देवावर कर लादण्यासारखा असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्हेंना आणि वेगवेगळ्या धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने किंवा सार्वजनिक कार्यक्रमांच्या दरम्यानही मॉन्ते कॅपेलला भेट दिली जाते.तसेच लग्न आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या खाजगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे लोकप्रिय स्थळ आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT