Pernem Dainik Gomantak
गोवा

Goa: पेडणेत मुसळधार पावसाचा कहर; झाडे, वीज खांब पडले उन्मळून

या मार्गावरील अवजड वाहतूक काही काळ बंद होती. येथील वीज पुरवठा तसेच रस्त्यावरील वाहतूक खंडित झाली होती.

दैनिक गोमन्तक

संततधार पावसामुळे पेडणे तालुक्यात (Pernem) ठिकठिकाणी झाडे तसेच वीज खांब उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला त्यात शनिवारी रात्री हरमल येथील नोनु रिसोर्ट जवळ मुख्य रस्त्यावरील वीज खांब कलांडल्याने वीज तारा लोंबकळत होत्या मात्र वेळीच वीजपुरवठा खंडित झाल्याने पुढील अनर्थ टळला. या मार्गावरील अवजड वाहतूक काही काळ बंद होती. येथील वीज पुरवठा तसेच रस्त्यावरील वाहतूक खंडित झाली होती.

वीज कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमातून खांब उभा करून रस्त्यावर कलांडलेल्या वीज तारा पूर्ववत केल्या त्यानंतर या मार्गावरील अवजड वाहतूक सुरळीत झाली तो पर्यंत दुचाकी तसेच लहान चारचाकी वाहने रस्त्याची बाजू घेवून येत जात होती.मात्र काही काळ याठिकाणी वाहतूक खंडित झाली होती.

दरम्यान मधलावडा पालये या ठिकाणी भलेमोठे भेंडीचे झाड रस्त्यावर कलंडल्याने या ठिकाणी वाहतूक खंडित झाली होती पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेवून ते झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT