Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Viral Video: दुचाकीसोबत तरुण गेला वाहत, महिलाही वाहता वाहता वाचली; गोव्यात पावसाचा रौद्र अवतार, पाहा व्हिडिओ

Goa Unseasonal Rain: राज्यात आज दिवसभर जोरदार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. खोर्ली उसपकर जंक्शनवर पाण्याचा लोट इतका होता की, एक दुचाकी थेट पाण्यात वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात आज दिवसभर जोरदार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांत यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं.

सकाळपासूनच पावसाने झोडपायला सुरुवात केलीय. काणकोणपासून पेडण्यापर्यंत राज्यातील बहुतेक भागांत संततधार सुरू होती. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

विशेष, म्हणजे खोर्ली उसपकर जंक्शनवर पाण्याचा लोट इतका होता की, एक दुचाकी थेट पाण्यात वाहून गेली. तर दुसरीकडे, एक महिला वाहता वाहता थोडक्यात वाचली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पावसामुळे लोकांना छत्री, रेनकोट यांचा आधार घ्यावा लागला. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला असून, नागरिकांनी काळजीपूर्वक राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या गोमंतकियांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र आज पावसाचा जबर तडाखा देखील सोसावा लागला आहे. रस्त्यांवर पाणी तुंबणे, घरांच्या छपरांमधून गळती, नाले तुंबणे, अशी स्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे.

गोवा हवामान विभागाने दोन दिवसांसाठी (२०, २१ मे) ऑरेंज अलर्ट दिला असून, पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज (मंगळवार) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT