Goa Rain Dainik
गोवा

Cyclone Montha: ‘मोंथा’चा गोव्‍यालाही फटका बसणार! वादळी वाऱ्यासह आणखी 3 दिवस मुसळधार बरसणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Montha cyclone impact: बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र होण्‍याची शक्‍यता असून, त्‍यामुळे पुढील ३ दिवस मुसळधार पर्जन्‍यवृष्‍टी होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अरबी समुद्र व बंगालच्‍या उपसागरात कमी दाब प्रणालींच्‍या प्रभावामुळे गोव्‍यात पाऊस ‘कोसळत’ आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सुरू आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र होण्‍याची शक्‍यता असून, त्‍यामुळे पुढील ३ दिवस मुसळधार पर्जन्‍यवृष्‍टी होईल. त्‍याला वेगवान वाऱ्यांची जोड लाभेल. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.

पावसाने रविवारी आक्रमक रुप धारण केले. त्‍यामुळे अनेक भागांमधील अंतर्गत आणि मुख्‍य रस्‍त्‍यांवर पाणी साचून पूरसदृश्‍‍य स्‍थिती निर्माण झाली. सत्तरी, डिचोली परिसरात पडझडीच्‍या घटना घडल्‍या असून, हातातोंडाशी आलेले भाताचे पीक भुईसपाट झाल्‍याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुसळधार पावसाने अनेक भागांतील जनजीवन विस्‍कळीत झाले. पुढील तीन दिवस राज्‍य हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे.

सरासरीच्‍या ३६.३ टक्‍के अधिक पाऊस

मान्‍सून हंगाम संपल्‍यानंतर १ ते २६ ऑक्‍टोबर या काळात राज्‍यात सरासरी ६.०२ इंच इतक्‍या पावसाची नोंद होते. परंतु, यंदा या काळात ८.२१ इंच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्‍या ३६.३ टक्‍के अधिक असल्‍याचे राज्‍य हवामान विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. पुढील तीन दिवसांत मुसळधार कायम राहण्‍याचा अंदाज असल्‍याने सरासरी पावसात आणखी वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim: 'परवाना एका नावाने, रेस्टॉरंट भलत्याच नावाने'! मोरजीतील धक्कादायक प्रकार; पंचायतीची कारणे दाखवा नोटीस

Serendipity Festival: 15 नाट्यप्रयोग, 17 मैफिली, कार्यशाळा! सेरेंडीपिटीचा गाजवाजा सुरू

Narakasur Goa : 'नरकासुर' प्रथा खरेच बंद होणार का?

Bhopal to Goa Flight : भोपाळकरांसाठी खुशखबर! सुट्टीसाठी बॅग भरा, 28 ऑक्टोबरपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू

अग्रलेख: ड्रग्ज व्यवहाराची आश्रयस्थाने शोधली तरच गोवा ‘नशामुक्त’ होईल..

SCROLL FOR NEXT