Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: उष्मावाढीने गोमंतकीय हैराण; घामोळे, त्वचा विकारांतही वाढ, काळजी घेण्याचा डॉक्टरांकडून सल्ला

Heat Wave In Goa: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून वाढत्या उष्म्यामुळे घामाचा धारा वाहत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून वाढत्या उष्म्यामुळे घामाचा धारा वाहत आहेत. असह्य उष्म्यामुळे अनेक त्वचा विकारांनादेखील नागरिक सामोरे जात आहेत.

मोठ्या प्रमाणात वाढलेल्या उष्म्यामुळे घामोळे, पुरळ येणे, त्वचा लाल पडणे अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे घामोळ्याचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक नागरिक पारंपरिक पद्धतीनुसार समुद्रावर स्नान करण्यासाठी जात आहेत तसेच अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचारही घेत आहेत.

एप्रिलच्या मध्यावर कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे, त्यामुळे येत्या काळात अजूनही तापमानात वाढ होणार आहे. नागरिकांनी उष्म्याचा प्रभाव कमी जाणवावा यासाठी योग्य ते उपाय योजणे गरजेचे आहेत.

पंखा, वातानुकूलीन सेवेचा वापर, योग्य संतुलित आहार, ताक, फळांचा रस, आंबील, शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी आदींचे सेवन करणे गरजेचे आहे. मसालेदार, तेलकट पदार्थ आहारातून शक्यतो कमी करावेत, मद्यपान तसेच कॉफी, चहाचे सेवन शक्यतो टाळावे, भरपूर पाणी पिणेदेखील आवश्‍यक आहे. आपल्या घरातील लहान मुले तसेच ज्येष्ठ

नागरिकांची योग्य ती काळजी घेणे, त्यांना उष्म्याचा त्रास जाणवणार नाही यासाठी योग्य उपाय करणे, गरजेचे असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.

पारा ३५ अंशांवर

मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ अंशांवर कायम आहे. आजही राज्यात कमाल ३५ अंश सेल्सिअस तर किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सामान्य तापमानाच्या तुलनेत १.७ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली.

राज्यात ७९ टक्के इतक्या कमाल आर्द्रतेची नोंद झाली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ३ टक्के अधिक होती. राजस्थान, तामिळनाडू तसेच कर्नाटकच्या काही भागात चक्रीय वारे आणि ट्रफचा प्रभाव आहे, त्यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यताही नाकरता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT