GMC  Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: गोमेकॉत पौष्‍टिक आहारामुळे रुग्‍णांना मिळतो लवकर आराम

जीवनाची गुरुकिल्ली: आंतरराष्ट्रीय ख्‍यातीच्‍या ‘सोडेक्सो’ कंपनीने उचललीय जबाबदारी; स्‍वच्‍छतेला प्राधान्‍य

दैनिक गोमन्तक

Nutritious Diet in GMC: पौष्टिक आहार ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. तोसुद्धा उपचारांचा एक अविभाज्य भागच. आजार लवकरच बरा होण्‍यासाठी आहारही तेवढाच चांगला असावा लागतो. पण बहुतांश सरकारी इस्‍पितळांत आहाराचा दर्जा राखला जात नाही.

पण अलीकडच्‍या काळात गोमेकॉ त्‍यास अपवाद ठरले आहे. तेथे स्वच्छता आणि गुणवत्ता मानके पूर्ण करणारा पौष्‍टिक आहार मिळावा यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी भर देऊन ‘सोडेक्सो’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लौकिकप्राप्‍त कंपनीशी करार केला. सध्‍या या कंपनीतर्फे गोमेकॉतील रुग्‍णांना आहार पुरविला जातो.

‘सोडेक्सो’ कंपनीला गोमेकॉतच जागा देण्‍यात आली आहे. अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने आहार बनविला जातो. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी २०१९ मध्ये ही सुविधा सुरू केली. डॉक्टरने नमूद केल्‍यानुसारच दरदिवशी रुग्णांना आहार दिला जातो. नाष्‍टा, जेवणाची वेळ ठरवून दिलेली आहे.

त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. कर्मचारी कमालीची स्‍वच्‍छता राखतात. सकाळी ८ व संध्याकाळी ४ वाजता नाष्‍टा-चहा तर दुपारी १२ व संध्‍याकाळी ७ वाजता रुग्‍णांना जेवण दिले जाते. आहाराबाबत निर्णय घेण्यासाठी डायटेशियन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेवणाबाबत निर्णय घेतला जातो.

गोमेकॉत तीन कँटीन्स आहेत, ती सोडेक्सोतर्फे चालविली जातात. त्यातील दोन कँटीन्स ही इस्पितळात येणाऱ्या लोकांसाठी आहेत. तेथे तुम्ही हवे असलेले पदार्थ खरेदी करू शकतात. तर, रुग्णांसाठी मोफत जेवण देणारे कँटीन आहे. तिन्‍ही ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाते. इस्पितळात विविध वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ही साधारण १२०० असते.

या रुग्णांना दरदिवशी सकस व चांगला आहार देण्याचे काम केले जाते. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे हे स्वतः इस्पितळाला तसेच स्वयंपाक खोल्यांना अचानक भेट देत असल्याने कर्मचारीही नेहमीच कामाबाबत तत्पर असतात. त्यामुळे जेवणाबाबत किंवा आहाराबाबत कोणत्याच तक्रारी येत नाहीत.

आहारात भाज्यांचे सत्त्व, दूध, अंडे, फळांचा समावेश

रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारामध्ये अधिक तर आजाराला पूरक असे अन्न दिले जाते. यामध्ये भाज्यांचे सत्त्व, दूध तसेच जेवणामध्ये केळी अथवा मोसंबी यासारखी फळे दिली जातात. काहींच्या आहारात अंड्याचाही समावेश असतो. रुग्णांना त्यांच्या आजारानुसार नाचणी वा बाजरीचे पौष्‍टिक सत्त्व देण्याचा गोमेकॉ व्यवस्थापनाचा विचार सुरू आहे.

२०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत

सोडेक्सोच्या स्वयंपाकघरांत अन्न हाताळणी, आरोग्य व स्वच्छता याविषयी सुमारे २०० हून अधिक प्रशिक्षित व जागरूक कर्मचाऱ्यांतर्फे संचालित अत्याधुनिक किचन इन्फ्रास्ट्रक्चरसह अन्न सेवा सुधारण्यास मदत झाली आहे.

या स्वयंपाकघरांमध्ये कॉम्बी-ओव्हन आणि इंडक्शन इक्विपमेंट्ससह स्मार्ट किचन संकल्पना समाविष्ट आहे, जी धूरविरहित स्वयंपाक देतात, मानवी थकवा कमी करतात आणि अन्नात सातत्य, गुणवत्ता राखतात. एकूणच स्वयंपाकघरांमध्ये अन्न तयार करण्याच्या स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे आणि नियमित गुणवत्ता तपासणी करण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT