Goa Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Health News: ये विश्वजीत राणे का स्टाइल है! आरोग्यमंत्री Action Mode मध्ये; तीन कर्माचाऱ्यांना केले निलंबित

Goa Health Minister Vishwajit Rane: आरोग्यमंत्र्यांनी अचानक म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली व विविध विभागांची पाहणी केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: येथील जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी (२४ फेब्रुवारी) आकस्मिक भेट दिली व कामकाजाची पाहणी केली. यावेळी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दोन चालक व अन्य एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

राज्यातील आरोग्य व्यवस्था सुरळीत असावी, लोकांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी आरोग्यमंत्री राणे यांचा कटाक्ष राहिला आहे. त्यासाठी विविध यंत्रणांवर लक्ष ठेवून ते आढावा घेतात.

मडगाव तसेच म्हापसा जिल्हा रुग्णालये 'रेफरल' बनली होती. तेव्हा त्या-त्या रुग्णालयांत बेफिकीरी चालणार नाही, पूर्ण क्षमतेने काम करावे, अशी तंबीही यापूर्वी राणे यांनी दिली आहे.

कर्मचारी 'अलर्ट'

आरोग्यमंत्र्यांनी अचानक म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली व विविध विभागांची पाहणी केली. राणे यांच्या अचानक एन्ट्रीमुळे कर्मचारीही 'अलर्ट' झाले. यावेळी राणे यांच्या पाहणीत काही त्रुटी आढळून आल्या. त्यांनी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. राणे यांनी यापूर्वीही अशी धडक कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT