Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Breast cancer रुग्णांसाठी आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 'फेसगो' इंजेक्शन मिळणार मोफत

Vishwajit Rane: कॅन्सरग्रस्तांनाही डीडीएसएसवाय योजनेखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राणेंनी म्हटले आहे

Ganeshprasad Gogate

Vishwajit Rane: गोवा मेडिकल कॉलेज 4 फेब्रुवारीपासून स्तनांच्या कॅन्सरवरील 'फेसगो' हे इंजेक्शन मोफत देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय. त्यांनी केलेल्या या महत्वाच्या घोषणेमुळे रुग्णांसाठी दिलासादायक चित्र तयार झाले आहे

पुढील दीड वर्षात अजून 1.50 लाख महिलांची तपासणी होणार असून गोव्याला स्तन कर्करोगमुक्त करणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. तसेच कॅन्सरग्रस्तांनाही डीडीएसएसवाय योजनेखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोव्यात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंदाजे 2.5 लाख महिला आहेत, पैकी आरोग्य सेवा संचालनालयाने स्तनाच्या कर्करोगासंबंधी 1 लाख महिलांचे स्कॅनिंग केले असून असे करण्यात गोवा पहिले राज्य असल्याची माहितीही विश्वजित राणे यांनी दिली.

पुढील दीड वर्षात उर्वरित काम पूर्ण करण्यात येऊन गोव्याला स्तन कर्करोगमुक्त करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

पुढील दोन महिन्यांत राज्यातील कॅन्सरग्रस्तांचीही डिजिटल नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना कॅन्सरग्रस्तांची माहिती आरोग्य खात्याला देणे बंधनकारक केले जाणार आहे.

याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. पुढील दोन वर्षांत राज्यातील टर्शरी कॅन्सर करार सेंटर पूर्ण होणार आहे.

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याला मदत केली असून त्यांचे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

लवकर निदान हा एकमेव उपाय:-

बदलती जीवनशैली, उशिरा लग्ने, अयोग्य आहार, कमी अपत्ये, व्यायामाचा अभाव यामुळे राज्यातील कमी वयातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

वर्षाकाठी सुमारे 300 च्या आसपास नवी प्रकरणे आढळून येत आहेत. यासाठी लवकर निदान हा एकमेव आणि फायद्याचा उपाय असल्याचे मत ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी काही महिन्यांपूर्वी मांडले होते.

आहार फॅटयुक्त न घेता प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे, मिनरल्स असलेल्या समतोल प्रमाणात असावा असे मार्गदर्शनही काही महिन्यांपूर्वी साळकर यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT