Health Minister Vishwajit Rane Visit Super Specialty Block GMC 
गोवा

Super Specialty Block GMC: आरोग्यमंत्री राणे यांनी गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकची केली पाहणी

राणे यांनी सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील विविध सुविधांचा आढावा घेतला तसेच, रूग्णांशी संवाद साधला.

Pramod Yadav

Health Minister Vishwajit Rane Visit Super Specialty Block GMC: आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज (शुक्रवारी) गोवा मेडिकल कॉलेजच्या (GMC) सुपर स्पेशालिटी ब्लॉकची पाहणी केली.

राणे यांच्यासोबत जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. अजित नगरसेकर, डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई आणि GMC चे इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील विविध सुविधांचा आढावा घेतला तसेच, रूग्णांशी संवाद साधला.

'पुरविण्यात आलेल्या सेवांची सुरू असलेली प्रगती आणि त्यांचे गुणवत्ता मूल्यांकन करण्यासाठी मी सर्व मुख्य विभागांना भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधला, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे का याची खात्री केली.'

'यावेळी उपस्थित डॉक्टर आणि परिचारिकांकडून रुग्णांची स्थिती आणि आजार जाणून घेतले. SSB मध्ये कार्यान्वित होत असलेल्या प्रत्येक वॉर्डातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.'

'रुग्णांना वेळेवर पौष्टिक आहार पोहोचवण्यावर भर देण्यासाठी सोडेक्सोसोबत बैठक घेण्यात आली. ज्याठिकाणी सुधारणा आवश्यक आहेत त्या क्षेत्रांचे मूल्यांकन केले. संपूर्ण SOPs पाळल्या जात आहेत याची खात्री करत आम्ही काम करत आहोत. गोव्यात सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम आहे.' असे ट्विट आरोग्यमंत्री विश्वजीत राणे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT