Vishwajit Rane | HMPV Dainik Gomantak
गोवा

HMPV बाबत जनजागृती करा; गोवा आरोग्य मंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना

Goa Health News: कोरोनानंतर चीनमध्ये HMPV या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होताना पाहायला मिळत आहे. भारतात देखील याबाबत काळजी घेतली जात आहे.

Pramod Yadav

पणजी: चीनमध्ये पुन्हा धुमाकूळ घातलेल्या एचएमपीव्ही आजाराबाबत जनजागृती करावी, अशी सूचना गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे. याशिवाय एनफ्युएंजा सारखे आजार, श्वसनासंबधित आजाराबाबत देखील लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये म्हणून माहिती द्यावी, असे मंत्री राणे यांनी सूचित केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी याबाबत विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला मंत्री राणे यांनी लेखी उत्तर दिले. राज्य सरकारला नव्याने आलेल्या एचएमपीव्ही आजाराबाबत माहिती आहे का? भारतात देखील काही राज्यात याचा प्रसार झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार याबाबत काय काळजी घेतेय?, असा प्रश्न फर्नांडिस यांनी विचारला होता.

नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये म्हणून एचएमपीव्ही बाबत जनजागृती करण्याची सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी उत्तरातून दिली. अधिकाऱ्यांना एनफ्युएंजा सारख्या आजारांसाठी एच१ए१ आणि कोरोनाच्या आवश्यक चाचण्या करण्याची सूचना देण्यात आलीय. गरज भासल्यास काही नमूने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवावेत, असे मंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाने २०२० मध्ये संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. कोरोना संसर्गाचा उदय चीनमध्ये झाला होता. त्यानंतर पुन्हा चीनमध्ये एचएमपीव्ही आजाराचा संसर्ग पाहायला मिळत आहे. देशात पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आलीय. भारतात देखील याबाबत सर्तकता घेतली जात असून, भीती बाळगण्यापेक्षा काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT