Sanquelim News: आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नाही, तर जीवन पद्धती आहे. त्यामुळे जीवन जगत असताना आयुर्वेद, योग, प्राणायाम याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास प्रत्येक व्यक्तीला निरोगी व संतुलित जीवन जगता येते.
हिवाळ्यात साजरी केली जाणारी 'धुंधुर मास' ही आयुर्वेदाची पूर्णपणे जोड असलेली पारंपरिक प्रथा सध्या शहरीकरणामुळे लुप्त होताना दिसत आहे.
पण मागील काही वर्षांपासून वैद्य सुविनय दामले यांनी धुंधुर मासाचे वैशिठ्य आणि महत्व पटवून देत हा उत्सव पुन्हा सुरु केला आहे.
गोव्यातही ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीनदयाळ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्यावतीने गुरुवार दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ७ वाजता, श्री राधाकृष्ण मंदिर, साखळी येथे धुंधुर मास पहाट भोजन व गुरुवर्य वैद्य सुविनय दामले यांचे आनंदी जीवनशैली या विषयावर सुश्राव्य असे व्याख्यान आयोजित केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी नाव नोंदणी आणि इतर सर्व माहितीसाठी वैद्य. कृपा नाईक (९७६४६००९८२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिवाळ्यातील डिसेंम्बर मध्यापासून जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत काळास धुंधुर मास असे म्हटले जाते. या मासात धुंधुर मास पहाट भोजन पूर्वी करत असत.
या धुंधुर मासातील पहाट भोजनाचे आरोग्यदायी महत्व असून या स्नेह भोजनाचे आयोजन पहाटेच केले जाते. महाराष्ट्रातही काही हॉटेल्समध्ये 'धुंधुर मास पहाट भोजन'ची संकल्पना सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.