Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : पाठिंब्याने नव्हे, स्वबळावर लढतो ; हरवळेतील सातेरकर गटाचा इशारा

Goa News : यात उगाच मुख्यमंत्र्यांचे नाव गोवू नये, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

साखळी रूद्रेश्वर मंदिरात आम्हाला आहे, तो मान कोणीही काढून घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या हक्कांसाठी रूद्रेश्वराच्या आशीर्वादाने स्वबळावर लढत आहे.

आम्हाला कुणाचाही राजकीय पाठिंबा नाही, असा खुलासा वरचे हरवळे येथील श्री सातेरकर गटाने केला आहे. यात उगाच मुख्यमंत्र्यांचे नाव गोवू नये, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

सातेरी देवस्थान अध्यक्ष गितेश मळीक म्हणाले की, हरवळेत होणाऱ्या पालखी सोहळ्याला दरवेळी गावातील दहा पंधरा लोक जातात. परंतु यावेळी भंडारी समाजातील लोकांनी या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याने आमच्या लोकांत भीती निर्माण झाली. दहा-पंधरा जण गेल्यास नाहक आमच्यावर हल्ला झाला तर काय करणार? या भीतीने जास्तच संख्येने गावकरी पालखीला गेले. त्यांना आम्ही आवाहन केले नव्हते.

नेत्यांना का हजर रहावे लागले ?

हरवळेतील रूद्रेश्वर मंदिरात मंत्री रवी नाईक, आमदार विरेश बोरकर, ‘आप’चे अमित पालेकर, सुनील कवठणकर व इतर नेत्यांना का उपस्थित रहावे लागले, याचा आधी विचार करायला हवा. यापूर्वी कधीच अशी वेळ आली नव्हती.

याला सर्वस्वी देवस्थान समिती जबाबदार आहे. हरवळे मळीक कुटुंबीयांचे असून रूद्रेश्वर मंदिराच्या सण उत्सवांमध्ये आम्हाला हक्क आहे. त्यासाठी आम्ही लढणारच, असे दशरथ मळीक यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्याचे नाव गोवणे निरर्थक!

हे प्रकरण आमचे व आमच्या गावचे आहे. हरवळे गाव हा आमचा म्हणजेच मळीक कुटुंबीयांचा आहे. त्यामुळे आमच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही लढणारच. या लढ्यासाठी आम्ही सर्व ती तयारी केली आहे. कायदेशीर मार्गाने जाण्यासही आम्ही तयार आहोत. परंतु या विषयात मुख्यमंत्र्यांचे नाव गोवणे निरर्थक आहे.

उलट कालच्या पालखी सोहळ्यात रूद्रेश्वर मंदिरात भंडारी समाजातील उपस्थित राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहता कोणाला कोणाचा आशीर्वाद व फूस आहे ते लक्षात येते, असे गितेश मळीक यांनी सांगितले.

हरवळेतील सर्व उत्सव व सण यापूर्वी कोणत्याही वाद व तंट्याशिवाय चालत होते. या समितीला परंपरा, सलोखा राखता आला नाही. ही स्वीकृत समिती असून उपजिल्हाधिकाऱ्यांनी बरखास्त करून त्यावर अनुभवी व ज्येष्ठ भंडारी समाजातील व्यक्तींची नेमणूक करावी.

-दशरथ मळीक, गावकरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT