Mala Lake Dead Fish Case: Dainik Gomantak
गोवा

प्रदूषण मंडळ, आरोग्य खाते करणार तलावाची पाहणी; पांगम यांची माहिती, मंगळवारी होणार सुनावणी

Mala Lake Dead Fish Case: ‘मळा’ येथील तलावात मोठ्या संख्येने मासे मृत अवस्थेत आढळल्याच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘मळा’ येथील तलावात मोठ्या संख्येने मासे मृत अवस्थेत आढळल्याच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली. या प्रकरणावर सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. सुनावणीनंतर महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, आरोग्य खाते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रित पाहणी करून उद्या मंगळवारी अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करतील.

या संदर्भात माहिती देताना देविदास पांगम म्हणाले की, वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे न्यायालयाने या पर्यावरणविषयक प्रश्नाची दखल घेतली आहे. न्यायालयाने या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळ, मत्स्योद्योग विभाग आणि आरोग्य खात्याला प्रतिवादी म्हणून समाविष्ट केले आहे.

मंगळवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करत आहेत. मासे का मृत पावले, याचे कारण शोधून त्याबाबतच्या शक्यता न्यायालयासमोर मांडल्या जातील.

न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. तलावातील मासे नेमके कशामुळे मरत आहेत, याचे कारण शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित विभाग या घटनेच्या कारणांचा शोध घेत असून, त्याचा सविस्तर अहवाल उद्या न्यायालयात सादर केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Chandra Gochar 2026: मानसिक शांतता आणि ऐश्वर्याचा मिलाफ! 5 राशींना मिळणार बँक बॅलन्स वाढवण्याची सुवर्णसंधी; महालक्ष्मीची कृपा

ICC Womens T20 Ranking: 12 महिन्यांचा प्रवास अन् ऐतिहासिक शिखर! भारताची 21 वर्षीय एन श्री चरणी बनली जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज

Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

दोन महिन्यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् 3 खून! बॉयफ्रेंडच्या मदतीनं तरुणीनं आई-वडिल अन् लहान बहिणीचा काढला काटा; बंगळुरु हादरलं

SCROLL FOR NEXT